नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना CCTV कॅमेरामध्ये कैद
Marathi May 19, 2025 11:24 AM

नागपूर बातम्या: नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चोरीच्या गुन्ह्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (नागपूर मध्य जेल) कैदी शासकीय वैद्यकीय रुग्णलायातून (Gओव्हरनमेंट मेडिकल हॉस्पिटल) उपचारादरम्यान चक्क पसार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 1 वाजून 44 मिनिटांनी ही घटना घडली असून ही घटना रुग्णलायात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हर्ष रामटेके असे पळालेल्या कैद्यांचं नाव आहे. त्याला राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याला दोन दिवसांपूर्वी चक्कर आणि उलटीचा त्रास होत असल्याने नागपूरचा शासकीय वैद्यकीय रुग्णलायत त्याला दाखल करण्यात आले होते.  यावेळी पोलिसांच्या निगराणी खाली असताना, मध्यरात्री संधीचा फायदा घेत तो पसार झाला.

पुढे आलेल्या माहितीनुसार,  ही घटना घडली त्यावेळी रुग्णलयाचा सुरक्षा रक्षाक बेंचवर बसला असतांना कैदी पळून जाण्यात यशस्वी झालाय. या प्रकरणात अजनी पोलीस ठाण्यात फरार झालेल्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस या फरार कैद्याचा शोध घेत असून त्याला पकडणे हे पोलिसांपुढील पुढचं आव्हान असणार आहे. सध्या पोलिसांनी त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आहे.

मटका बुकीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 33 जणांविरोधात गुन्हा

तुळजापुरात मटका बुकीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, व्हाट्सअपच्या माध्यमातून हा मटक्याचा जुगार सुरू होता. या प्रकरणी चार आरोपींसह एक लाख 39 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीमध्ये भाजपचे विनोद गंगणे, सचिन पाटील, तर काँग्रेसचे अमोल कुतवळ यांचा समावेश आहे. तर पोलिसांनी रोख रकमेसह लॅपटॉप, प्रिंटर मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या मटका रॅकेटचे इतर जिल्ह्यातही धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता बाळवली आहे. सध्या पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्गाने जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना चामोर्शी शहरातील आष्टी- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर घडली. विनोद पुंजाराम काटवे (45), राजू सदाशिव नैताम (45) आणि सुनील वैरागडे (55) सर्व  रा. गडचिरोली असे ठार झालेल्यांची नावे असून अनिल मारोती सातपुते (50) वर्ष, रा. चामोर्शी  हे गंभीर जखमी आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर केले आहे. चारही जण कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यु टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.