Stocks In Focus : गुंतवणूकदारांना कमाईची संधी, आज 'हे' १२ शेअर्स असतील फोकसमध्ये
ET Marathi May 19, 2025 12:45 PM
मुंबई : शेअर बाजारात आज सोमवारी १९ मे २०२५ रोजी अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील. तिमाही निकाल, नवीन आदेश, न्यायालयीन याचिका आणि लाभांश घोषणा यामुळे हे शेअर्स फोकसमध्ये असतील. गुंतवणूकदारांना या शेअर्समधून कमाई करण्याची संधी असेल. या शेअर्सबद्दल जाणून घेऊया. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL)सरकारी संरक्षण कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सला ५७२ कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये ड्रोन डिटेक्शन सिस्टीम, सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ आणि डेटा कम्युनिकेशन युनिट्स सारखी हाय-टेक संरक्षण उपकरणे समाविष्ट आहेत. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स ३६३.९० रुपयांवर बंद झाले. भेल (BHEL)भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) चा चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा ४% वाढून ५०४ कोटी रुपये झाला. हा नफा बाजारातील अंदाजापेक्षा खूपच कमी होता. महसूलही ९% वाढला. परंतु बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो अयशस्वी झाला. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स १.० टक्क्यांच्या वाढीसह २५०.३५ रुपयांवर बंद झाले. भारती एअरटेल (Bharti Airtel)भारती एअरटेल आणि तिची उपकंपनी भारती हेक्साकॉम यांनी समायोजित एकूण महसूल (AGR) थकबाकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, दिलासा न मिळाल्यास या दायित्वाचा परिणाम केवळ त्यांच्या कामकाजावरच नाही तर संपूर्ण दूरसंचार क्षेत्रावर होऊ शकतो. यापूर्वी व्होडाफोन आयडियानेही अशाच प्रकारची सूट मागितली होती. डिवीज लॅबोरेटरीज (Divi’s Laboratories)चौथ्या तिमाहीत डिवी लॅब्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा २३% ने वाढून ६६२ रुपये कोटी झाला. तर महसूल १२.२% ने वाढून २,५८५ कोटी रुपयांवर गेला. EBITDA मार्जिन 34.27% वर मजबूत राहिला. कंपनीने आर्थिक वर्ष २५ साठी प्रति शेअर ३० रुपये लाभांश जाहीर केला आहे. दिल्लीवरी (Delhivery)लॉजिस्टिक्स कंपनी दिल्लीव्हरीने चौथ्या तिमाहीत ७२.६ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षी याच कालावधीत तोटा होता. महसूल ५.६% वाढला आणि EBITDA तिप्पट वाढून ११९ कोटी रुपये झाला. कंपनीने आर्थिक वर्ष २५ मध्ये १६२ कोटींचा वार्षिक निव्वळ नफा नोंदवला आहे. केईसी इंटरनॅशनल (KEC International)आरपीजी ग्रुपची ईपीसी कंपनी केईसी इंटरनॅशनलने ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन सेगमेंटमध्ये १,१३३ कोटी रुपये किमतीच्या नवीन ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे. हे प्रकल्प भारतात आहेत आणि त्यामुळे कंपनीची ऑर्डर बुक आणखी मजबूत होईल. कल्पतरू प्रोजेक्ट्स (Kalpataru Projects)कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलने चौथ्या तिमाहीत २२५.४ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. नफा ३७.२% वाढला आहे. कंपनीचा महसूल १८.३% ने वाढून ७,०६६.७ कोटी रुपये झाला आणि EBITDA मध्येही जवळपास १९% वाढ झाली. कंपनीने प्रति शेअर ९ रुपये लाभांश जाहीर केला आहे. टेक्समॅको रेल (Texmaco Rail)टेक्समॅको रेलचा महसूल १७.५% ने वाढून १,३४६.४ कोटी रुपये झाला. तर EBITDA १४.७% ने वाढून ९७.६ कोटी रुपये झाला. मात्र, निव्वळ नफा १२% कमी होऊन ४० कोटी रुपये झाला. कंपनीने प्रति शेअर ०.७५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. अरविंद फॅशन्स (Arvind Fashions)अरविंद फॅशन्सने चौथ्या तिमाहीत ९३.१५ कोटींचा तोटा नोंदवला. कंपनी गेल्या वर्षी नफ्यात होती. मात्र, महसूल ८.८% वाढला आणि EBITDA मध्ये १८% सुधारणा झाली. ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India)ह्युंदाई मोटर इंडियाचा मार्च तिमाहीचा नफा ४% ने घसरून १,६१४ कोटी रुपये झाला. तर महसूल किरकोळ वाढून १७,९४० कोटी रुपये झाला. कंपनीने प्रति शेअर २१ रुपये लाभांश जाहीर केला आहे. स्टरलाईट टेक्नॉलॉजीज (Sterlite Technologies)स्टरलाइट टेक्नॉलॉजीजने चौथ्या तिमाहीत ४० कोटींचा तोटा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ८२ कोटींपेक्षा कमी आहे. महसूल २५% वाढून १,०५२ कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन १३.९% पर्यंत वाढला. धामपूर शुगर मिल्स (Dhampur Sugar Mills)धामपूर शुगरचा निव्वळ नफा ५.४% कमी होऊन ४९ कोटी रुपये झाला. तर महसूल १०% वाढून ₹६१९ कोटी झाला. EBITDA मध्ये ४.९% ने वाढ झाली. परंतु मार्जिन किंचित कमी होऊन १६.३% झाले.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.