'आशिकी' (Aashiqui ) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील गाणी खूपच हिट झाली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) मुख्य भूमिकेत झळकले. हा चित्रपट 1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामुळे अनु अग्रवाल आणि राहुल रॉय यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे.
आता पुन्हा एकदा अनु अग्रवाल चर्चेत आल्या आहेत. त्याच्या एका विधानाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री यांनी 'आशिकी' चित्रपटाचे पूर्ण मानधन त्यांना मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवाल यांनी हा मोठा खुलासा केला आहे.
अनु अग्रवाल म्हणाल्या की, "'' जेव्हा चित्रपट आला तेव्हाच्या काळी इंडस्ट्रीत येणारा पैसा हा अंडरवर्ल्डचा असायचा. कारण इंडस्ट्रीत दाऊद इब्राहिमसारख्या लोकांचे राज्य होते. त्यामुळे मला आजही 'आशिकी' चित्रपटाचे सगळे मानधन मिळाले नाही आहे. ठरवलेल्या मला फक्त 60 टक्के पैसे मिळाले आहेत. उरलेले 40 टक्के पैसे अद्याप मिळाले नाही."
पुढे अनु अग्रवाल म्हणाल्या की, "'आशिकी' चित्रपटानंतर मी मॉडेलिंगमध्ये खूप पैसे कमावले. मी अनेक ब्रँड्सची ब्रँड अँबेसिडर देखील होते. ज्यावेळी कोणताही अभिनेता ब्रँड अँबेसिडर नव्हता. आता ठीक आहे की मला ते पैसे नाही मिळाले. मी असे समजते की, मीच त्यांना ते पैसे गिफ्ट म्हणून दिले." अनु अग्रवाल यांच्या या विधानाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनु अग्रवाल सध्या एका सामाजिक कार्यकर्त्याला आहेत.