उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या असणे सामान्य आहे. म्हणून, या ऋतूत शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी, आहारात थंड स्वरूपाच्या गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यापैकी एक म्हणजे उन्हाळी सुपरफूड दही. दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण यात कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट असे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर असतात. पण दही खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल अनेकाजण संभ्रमात असतात. तुम्हाला सुद्धा हाच संभ्रम दुर करायचा असेल तर आजच्या लेखात आपण दही खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात…
काही लोकांना जेवणानंतर दही खायला आवडते. पण काही लोकं असे आहेत जे रात्री दही खातात. चला तर मग जाणून घेऊया दही खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे आणि रात्री का खाऊ नये यामागचे कारण जाणून घेऊयात…
दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
रात्री दही खाणे टाळावे. दही खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे किंवा तुम्ही जेवणानंतर दुपारी दही खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला दह्यामध्ये असलेले सर्व पोषक घटक मिळतील आणि ते तुमच्या आरोग्याचे नुकसान होणार नाही.
रात्री दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते
रात्री दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही कारण त्यात प्रथिने आणि फॅट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रात्री दही खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात आणि तुमची पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.
किडनीच्या समस्या असलेले रुग्ण
ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी दही खाणे टाळावे. कारण त्यात फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
दही कोणासाठी हानिकारक आहे?
दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. पण असे बरेच लोकं आहेत ज्यांच्यासाठी दही हानिकारक देखील असू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असेल तर तुम्ही दही खाऊ नये.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)