Is Swimming Safe During Monsoon: पावसाळा हा उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा देणारा असतो. पाऊस पडला की मंद येणारा मातीचा सुगंध अनुभवायला मिळतो. तसेच अनेकांना पावसात भिजायला आवडते तर अनेक लोक गरम चहा आणि भजी यावर ताव मारतांना दिसतात.
तर सध्या अनेक लोक पाऊस पडताच फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करतात आणि आनंद व्यक्त करतात. पण तुम्हाला कधी असे प्रश्न पडले का की पावसाळ्यात पोहणे योग्य आहे का? बीचवर जाऊ शकतो का? माश्या का असतात? चला तर मग आज या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
पावसाळ्यात पोहणे योग्य आहे का?
पोहणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण मुसळधार पावसात पोहणे टाळले पाहिजे असा सल्ला अनेक लोक देतात. वादळ किंवा मुसळधार पावसात पोहणे टाळले पाहिजे. कारण पाऊस जीवाणू आणि हानिकारक पदार्थ पाण्यात वाहून आणू शकतात. ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. तसेच थेट पावसाच्या पाण्यात पोहल्याने ताप किंवा इतर आजार उद्भवू शकतात.
पावसाळ्यात आपण बूट घालू शकतो का?
अनेकांना असा प्रश्न पडतो की पावसात बूट घालावे की नाही? कारण पावसात बूट भिजल्यास पाय ओले राहतात आणि मग इतर समस्या वाढतात. पण पावसाळ्यात बूट घालणे योग्य आहे. तुम्ही पावसाळ्यात रबर किंवा वॉटरप्रुफ बूटचा वापर केला पाहिजे. यामुळे पाय कोरडे राहतात. तसेच पावसाळ्यातील चिखलापासून पायांचा बचाव होतो. बूट हे रबराचे असल्याने घसण्याची शक्यता राहत नाही. तुमचा बूटहा वॉटरप्रुफ असावा. यामुळे पाणी आत शिरणार नाही. बाजारात तुम्हाल पावसाळ्यात शूज सहज मिळतील.
आपण पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकतो का?
पावसाळ्यात गेल्यावर निसर्गाचा नयनरम्य दृश्य पाहू शकता. पावसाळ्यात आजूबाजूला हिरवळ वाढते आणि निसर्गाचे सौंदर्य देखील वाढते. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात पर्यटकांची संख्या कमी असते. यामुळे बीचवर जास्त गर्दी नसते. पावसाळ्यात भिजणे, खेळणे,समुद्राची मज्जा घेणे आनंदायी असू शकते. जर बीचवर लाटा आणि खवळलेला असेल तर वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे. पावसाळ्यात बीचवर जाऊ शकतो पण तेथील स्थानिक नियमांचे पालन करावे.
पावसाळ्यात इतक्या माश्या का असतात?
सगळ्यात जास्त त्रास हा माश्याचा होतो. कुठेही गेले तरी माशा या असतातच. कारण हवामानातील बदलामुळे ही समस्या वाढते. पावसाळ्यात जास्त आद्र्ता आणि तापमान वाढल्यामुळे माश्यांसाठी प्रजननाचे पोषक वातावरण तयार होते. तसेच पावसाळ्यात कचरा खुप सडतो, ज्यामुळे माशा आकर्षित होणारा वास निर्माण होतो. यामुळे घरातील कचरा वेळोवेळी स्वच्छ करा. घरात सडलेल्या भाज्या आणि फळे ठेऊ नका. यामुळे माशांचे प्रमाण कमी होऊ शकते.
आपण विमानात चप्पल घालू शकतो का? हे
हो, तुम्ही विमानात चप्पल घालू शकता. चप्पल घातल्याने पाय थंड आणि कोरडे राहतात. यामुळे तुम्हाला आराम मिळतो. चप्पल घातल्याने पायांना सहज हालचाल करता येते.तसेच पायांन घाम येण्याची शक्यता कमी असते. विमानात चप्पल घातल्यास आणीबाणीच्या काळात लवकर काढून पळू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.