Nandurbar LCB : गरिबांच्या रेशन धान्याचा गुजरातमध्ये काळाबाजार; तांदुळाने भरलेले तीन ट्रक जप्त
Saam TV May 19, 2025 09:45 PM

सागर निकवाडे 

नंदुरबार : गरीब रेशन कार्ड धारकांना मोफत धान्याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशाच प्रकारे गरिबांचे रेशनचे धान्य विक्रीसाठी गुजरात राज्यात नेले जात असताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रेशनच्या तांदळाने भरलेले तीन ट्रक माल पोलिसांनी जप्त केला आहे. 

च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने राष्ट्रीय महामार्गरील विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोलपंप समोर सापळा रचला. यावेळी तिनही ट्रक काही वेळाचे अंतराने आले असता त्यांना थांबविण्यात आले. हे ट्रक येथून गुजरात राज्यात जात होते. ट्रक थांबवून चालकांना विचारणा केली.  

मालाच्या पावत्या नसल्याने तपासणी 

ट्रक चालक अमोल प्रल्हाद गिरे (वय ३०, रा. डोयफळवाडी, जि. बीड), रावसाहेब फकीरराव दिघोळे (वय २७, रा. निंभोरा, जि. संभाजीनगर) व सचिन बाळासाहेब पवार (वय ३०, रा. खातखेडा, जि. संभाजीनगर) यांना ट्रकमधील मालाबाबत विचारणा केली असता तांदुळचा माल घेऊन तिनही ट्रक गुजरात राज्यात जात असल्याचे सांगितले. सदर तांदुळ मालाच्या पावात्यांबाबत विचारले असता वैध पावत्या नसल्याचे दिसुन आले. पथकाने मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाच्या तांदुळ भरलेल्या गोण्या मिळुन आल्या, गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते. तसेच तांदुळची पाहणी करता तो साठवणुक केलेला चा जुना तांदुळ असल्याचे दिसून आले. 

तीनही तांदूळचे ट्रक जप्त 

यानंतर पोलिसांनी तिन्ही ट्रक चालकांना ताब्यात घेतले. तसेच सदर तिनही ट्रकमधुन एकुण ८५६ क्विटल रेशनचा तांदुळ व वाहन असे मिळुन ५३ लाख ७६ हजार ६३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.