Maharashtra News Live Updates : हॉर्न वाजवण्यावरून वाद, टेम्पो चालकाने केली रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण
Saam TV May 20, 2025 01:45 AM
हॉर्न वाजवण्यावरून वाद, टेम्पो चालकाने केली रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण

हॉर्न वाजवण्यावरून रिक्षा चाकाने टेम्पोचालकाला जाब विचारला त्यावरून रिक्षा चालक आणि टेम्पो चालकामध्ये वाद झाला .याच वादातून टेम्पो चालकाने रिक्षा चालकाला लोखंडी रोड व लाकडी बांबुने बेदम मारहाण केली . कल्याण नेतेवली परिसरात ही घटना घडली .या मारहाणीत रिक्षा चालक समीर शेख जखमी झालाय तर मारहाणीनंतर टेम्पो चालक पसार झाला आहे . याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाने तक्रार नोंदवली असून फरार झालेल्या टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .

अवकाळी पाऊसाचा सोलापूर जिल्ह्यात कहर

सोलापुर जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात जवळपास 240 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात झाले मोठे नुकसान

केळी,आंबा पालिभाजा यांच्या समावेश असून पंचनामे करण्याचे काम सुरु

नाशिक - भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार प्रात्यक्षिके

- भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार प्रात्यक्षिके

- येत्या २३ मे ला भारतीय तोफखाना, आर्टिलरी स्कूलकडून गोळीबाराची प्रात्यक्षिके

- २३ मे ला सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत होणार गोळीबाराची प्रात्यक्षिके

- गोळीबार प्रात्यक्षिकांच्या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या प्रवेशाला मनाई

- नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, नांदूर वैद्य, दाढेगाव, शिंगवे बहुला, वडनेर, पिंपळगाव खांब या गावांच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्याच्या रेषेत येत असल्यानं या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

- प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही

- याशिवाय या सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचा देखील इशारा

विविध मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर, राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प रखडणार

राज्यातील भूमी अभिलेख कर्मचार्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुणे विभागातील विमानतळ त्याचबरोबर रिंग रोड अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प यामुळे रखडणार आहेत.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावणारा १२ तासात जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी एका दुचाकी वरुन आलेल्या अनोळखी तरुणाने त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेलं. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून फिरत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेत हा तरुण आंबेगाव पठार येथे कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी तात्काळ धाव घेतली. पोलिस येताच त्याने तिथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या मागे जात त्याला ताब्यात घेतले

इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाला यश

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया बॅलट पेपर वरती असल्याने मतमोजणीस विलंब होत आहे मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व कल हाती येतील तर रात्री दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.

भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांना डीपीडीसीच्या बैठकीत जाताना गेट वरती अडवले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून या बैठकीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख हे जात असताना त्यांना पोलिसांकडून गेट वरतीच रोखण्यात आले आहे. पोलिसांमध्ये आणि जिल्हाध्यक्षांमध्ये आतमध्ये सोडण्यावरून बराच वेळ गेटवर तणाव पाहायला मिळाला भाजपा जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी आतमध्ये सोडता परत पाठवले.

एपीएमसी मार्केट आवारात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेली दुक्कल गजाआड

वाशीतील एपीएमसी मार्केटमधील पुनित कॉर्नर जवळच्या पार्कींगमध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली आहे. ३७ वर्षीय दिनेश रमेश सालीयन व २६ वर्षीय शिवम दयाशंकर सिंग अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे एमडी, चरस आणि हायब्रिड गांजा अमली पदार्थ व त्यांची दुचाकी जप्त केली आहे. या दोघांनी सदरचे अमली पदार्थ कुठून आणले याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेजोगाई मध्ये जाऊन पीडित शिवराज दिवटे यांची भेट घेणे टाळले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या याकर्त्याचा मराठा समाज बांधवांकडून निषेध.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आंबेजोगाई मध्ये जाऊन कार्यक्रमा केले मान्यवरांच्या भेटी घेतल्या मात्र मारहाण झालेल्या शिवराज दिवटे ची भेट का घेतली नाही.

मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यामुळे एवढी गंभीर घटना घडताना देखील पालकमंत्री असताना भेट न घेणे म्हणजे हे दुर्दैव आहे.

आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये आले होते मात्र त्यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेतली नाही भेट कशामुळे घेतली नाही त्याचबरोबर भेट घेणे गरजेचे होते अशी देखील प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.

हिंगोलीत घरावर वीज कोसळली, घराचं मोठं नुकसान

हिंगोली मध्ये वादळी वाऱ्यादरम्यान एका घरावर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे, हिंगोली शहरातील जीन माता नगर परिसरात संतोष गंगावणे यांच्या घरावर ही वीज कोसळली आहे, वीज कोसळल्याने या घराचं मोठं नुकसान झाला आहे तर घरातील विजेवर चालणारी एसी फ्रिज यासारखी उपकरणे जळून खाक झाली आहेत दरम्यान ही वीज कडाडल्यानंतर स्फोट झाल्यासारखा आवाज आल्याने घरातील वृद्ध नागरिकांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे , हिंगोलीत घरावर विज कोसळण्याची ही पहिलीच घटना असल्याने प्रशासनाने देखील या सगळ्या घटनेची माहिती घेत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार पुन्हा मैदानात

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस मॅरेथॉन बैठका

आगामी महापालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील आता मैदानात उतरले

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षाच्या मॅरेथॉन बैठका होणार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने येत्या २६, २७ आणि २८ मे रोजी सलग तीन दिवस महत्वाच्या बैठकीचे आयोजन

या बैठकांचा मूळ उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित असणार मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आणि इतर प्रमुख शहरावर नजर असणार

२८ मे रोजी होणाऱ्या बैठकीला पक्षप्रमुख शरद उपस्थित राहणार

या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे २८ तारखेला होणारी बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता

महाड MIDC अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी ग्रामस्थ रस्तावर

चार दिवसा पूर्वी महाड MIDC परिसरात 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. खाऊला पैसे देतो या बहाण्याने बोलवून आरोपी विलास हुलालकर वय वर्ष 48 याने पिडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत समाज बांधव आणि ग्रामस्थ रस्तावर उतरले. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन करीत मोर्चेकऱ्यांना महाडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे झाले संतप्त

- लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता बैठकीला अनुपस्थित

- गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे कोकाटेंचे आदेश

- मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवण्याच्या कोकाटे यांच्या सूचना

- सोलरच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटे यांनी धरले धारेवर

- मागेल त्याला शेततळे देतात मग सोलर का देत नाही ? असा प्रश्न विचारत कोकाटे झाले संतप्त

हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची जीवघेणी कसरत

नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र बनल्या आहेत. नांदेडच्या अनेक तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधी तांडा येथे देखील पाण्याची टंचाई अधिक तीव्र बनली आहे. हंडाभर पाण्यासाठी या तांड्यातील महिला, पुरुष, लहान मुलांना पायपीट करावी लागत आहे. गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून या गावकऱ्यांना पाणी काढताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही जीवघेणी कसरत मागील वीस वर्षापासून सुरू असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले. गावात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना आल्या परंतु त्या योजना कुचकामी ठरल्या त्या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. मागील वीस वर्षापासून गावकरी पाण्यासाठी असा हा जीवघेणा संघर्ष करत आहेत.

राज्यात येणारा पाऊस हा अवकाळी पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस

विदर्भात 14 तारखेपूर्वीचं मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला- हवामान तज्ञ अनिल बंड यांची माहिती

विदर्भात फेब्रुवारी महिना आतापर्यंत सर्वात उष्ण होता त्यामुळे वारे बदलले व लवकरच विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला

Maharashtra News Live Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जून रोजी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर पार पडली या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील व विशेष सहाय्यक सरकारी वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी03 जून तारखेस ठेवली आहे.

चरणमाळ घाटात भीषण अपघात

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात भीषण अपघात..

चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर उलटला....

ट्रक पलटी झाल्याने 26 रेड्याच्या घाटात पडला खच....

अपघातात ट्रक मधील 35 रेड्यांपैकी 26 रेड्यांचा जागीच मृत्यू....

सकाळी म्हशी आणि वासरु घेऊन ट्रक पिंपळनेर कडून गुजरात कडे जात असताना घडला अपघात...

चरणमाळ घाटात च्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रँक घाटात पलटी....

अपघातात ट्रकचाला गंभीरित्या जखमी.

तुकोबांच्या पालखी रथासाठी संस्थान करणार बैल जोडीची स्वतः खरेदी

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला व चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने स्वतः बैलजोडीची खरेदी करणार असल्याचे प्रसिद्धीद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया व रथाला बैलजोडी जुंपण्याचा मिळणारा मान ही प्रचलित प्रथा यंदा प्रथमच बदलली जाणार आहे. यंदा संस्थानच्या नवनिर्वाचित पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त मंडळाने प्रथमच संस्थानच्या वतीने बैलजोडी खरेदी करून त्यांनाच रथाला जुंपण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा आश्चर्यकारक व ऐतिहासिक बदल असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील परिसरातील श्री संत तुकाराम महाराजांवर श्रद्धा ठेवणारे शेतकरी व भाविक नाराज होण्याची शक्यता आहे . पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने भाग्याचे होते.

बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती सुरू आहे. रविवारी 18 मे रोजी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान झाले 74.25 टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध गटांना एकत्र करून जय भवानी माता पॅनल उभा केला होता

सैनिकांच्या सन्मानार्थ महाडमध्ये तिरंगा रॅली

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज महाड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सीमेवर लढणाऱ्या आणि शहीद जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांनी रॅली चे नेतृत्व केले . हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाच्या घोषणा देत महाडकर नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीपूर्वी मंत्री गोगावले यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात खड्ड्यात गाढून घेत अंतरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरगाव येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी एकत्र येत रस्त्यामध्येच पाच फूट खड्डा खोदून त्यात स्वतःला कमरेपर्यंत मातीमध्ये गाढून घेत आंदोलन चालू केले आहे. बार्शी - पाथरूड या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून अंतरगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत होती.मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील मागील दोन वर्षापासून बार्शी पाथरूड अंतरगाव हद्दीतील रोड मंजूर असून अद्यापही त्याचे काम पूर्ण झाले नाही.त्यामुळे रस्ता खोदून अर्धे शरीर खड्ड्यामध्ये पुरून रोडवरच ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.खराब रोड मुळे शाळकरी विद्यार्थी होणारी त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केलीय.

मनमाडला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशन लागले ठिकठिकाणी गळू

मनमाडला रात्री झालेल्या धुवांधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या सर्वच प्लॉट फार्म वरील छताना मोठ्या प्रमाणात गळती लागली,ठिकठिकाणी छतातून इतकं पाणी गळत होते की प्रवाशांना उभे राहणे देखील कठीण झाले त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले.विशेष म्हणजे काही महिन्या पूर्वीच लाखो रुपये खर्च करून सर्व प्लॉट फॉर्मच्या छतावरील सिमेंटचे पत्रे काढून त्याजागी लोखंडी पत्रे बसविण्यात आले तरी देखील पाण्याची गळती सुरूच आहे त्यामुळे लाखो रुपये वाया गेले असून रेल्वे प्रशासना तर्फे प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात येत असल्याचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आलय

हवामान खात्याचा रायगडला इशारा

पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची वर्तवली शक्यता

21 मे पर्यंत यलो अलर्ट तर 22 मेला रेड अलर्ट

ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची भिती

Maharashtra News Live Updates : कोंढव्यात भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडले

कोंढवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौका जवळ भरधाव इनोव्हा गाडीने एका लहान मुलाला चिरडले. अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

बुलढाण्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अद्याप कायम आहे .. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात भाग बदलत.अवकाळी पाऊस पडत आहे .. सोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान सुद्धा होत आहे .. काल सायंकाळी सुद्धा विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.. साखरखेर्डां परिसरात ही मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील नाल्या वाहू लागल्या तर वीज पडल्याने शेतकऱ्यांचे चार जनावरे सुद्धा मरण पावली .. अनेक भागात उन्हाळी पिक अद्याप उभी असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले.

पुणे - मिरज - कोल्हापूर मार्गावर नवी डेमू सुरू

अखेर पुणे - मिरज - कोल्हापूर मार्गावर नवी डेमू ( डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ) रेल्वे गाडी धावू लागली आहे. दैनिक सकाळच्या बातमीमुळे वारंवार बंद पडणाऱ्या लाल डेमू पासून प्रवाशांची सुटका झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून वारंवार बंद पडणारी लाल डेमू हटवून त्याजागी नवी कोरी डेमू या मार्गावर दाखल झाली आहे. यात सुटसुटीत आसन व्यवस्थित सह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या संशयिताला २ दिवसांची पोलिस कोठडी

* आरोपी राहुल भुसारे याने 1 कोटी रुपयांच्या खंडणीची केली होती मागणी

* भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी विविध नंबरवर फोन व SMS पाठवले

* खंडणीची मागणी केल्याने गुन्हा शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अटक

* आरोपीकडून मोबाइल व SIM कार्ड जप्त, पुढील तपास सुरू

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल दीड हजार कोटीचे कर्ज थकीत

कर्जमाफीच्या चर्चेने अमरावती जिल्ह्यातील 1,29.447 शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून गतवर्षी घेतलेल्या कर्जाचा भरणा केला नाही

शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली नसल्याने बँका देखील अडचणीत

यावर्षी नियमीत खातेदारांना फक्त दीड महिन्यात 6936 शेतकऱ्यांना 513.10 कोटीचे कर्ज वाटप

मागील वर्षी बँकेकडून कर्ज घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी भरले नसल्याने अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप हंगामात बँके कडून कर्जापासून राहणार वंचित

थकीत कर्ज असल्याने शेतकऱ्यांना बँक देत नाही कर्ज

गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना अटक...मालेगाव पोलिसांची कारवाई

वाशिमच्या मालेगाव पोलिसांना बुलडाणा जिल्ह्यातून दोन जण गांजा घेऊन येत असल्याच्या गुप्त माहितीवरून त्यांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याजवळून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. २ किलो गांजा सह एक दुचाकी असा एकूण 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख मोहसीन शेख युसुफ ,(वय २७ वर्षे) व अब्दुल फहीम अब्दुल कय्युम (वय ३७ वर्षे )दोघेही रा.मेहकर,जिल्हा बुलडाणा. अशी आरोपींची नावे आहेत. मालेगाव मेहकर मार्गावरील मुंगळा फाट्यावर ही कारवाई पार पडली.

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादाण, वीज कोसळून ३ जण ठार

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादण उडवली. वीज कोसळून ३ जण ठार; अकरा जनावरे दगावली तर उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागात अनेक घरात पाणी शिरले. अवकाळीने संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार झोडपले. संभाजीनगरात विक्रमी ५९.४ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. मात्र काल सायंकाळी या उन्हाळ्यातील सगळ्यात मोठा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला.

जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

जत तालुक्यातील पूर्व भागातील संख, गोंधळवाडी सह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे.वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडला आहे.वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळेवाडी, गुड्डडापूर,असंगीतुर्क रस्त्यावरील सह परिसरातील रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली होती,तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्याचा प्रकार घडला आहे.तर वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.दरम्यान रस्त्यावरून पडलेली अनेक झाडे तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून रात्रभर प्रयत्न करून हटवण्यात आली.

उल्हासनगर,अंबरनाथ मध्ये अवकाळी पावसाची हजेरी

पहाटे चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस...

अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ

पावसाने रस्ते झाले जलमय..

उकाड्याने ग्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या न्यायालयात आज सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर होत आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम सुनावणीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे या अगोदरच्या सुनावणीच्या वेळेस देखील सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर होते त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले होते आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी होत आहे.

रायगडला लवकरच पालकमंत्री मिळेल - अजित पवार

रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र पालकमंत्री नसतानाही जिल्ह्यातील निधी खर्च व्हावा तो लॅप्स होऊ नये यासाठी प्रयत्न केले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या निकषावर रायगड जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

नांदुरा येथील रेल्वे गेट लागल्याने ट्रॅफिक, तब्बल तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे रेल्वे गेट लागल्याने मोठी ट्रॅफिक जाम झाली होती .. वाहनाच्या तब्बल तीन दोन तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. . यामुळे दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागला .. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर रेल्वे चे गेट असून याठिकाणावरून सुपरफास्ट रेल्वे गाडी जात असल्याने नेहमीच गेट बंद करावे लागते .. दरम्यान नांदुरा वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या वाहनाच्या याठिकाणी नेहमीच रांगा लागतात. . सोबतच याला लागून जुना मलकापूर ते नागपूर हायवे आहे . त्यावर सुद्धा मोठी वाहनाची गर्दी असते , त्यामुळे याठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते .. याठिकाणी उड्डाणपूल ची मागणी जुनी असून अद्याप याकडे आतापर्यंत अधिकारी , राजकीय व्यक्तीनि कानाडोळा केलेला दिसतोय ..

लोहारा, उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

धाराशिव च्या लोहारा,उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे.अनेक ठिकाणी झाडे तुटुन पडली तर विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत.कास्ती खुर्द या गावात शेतात झाड पडुन शेतकऱ्याची म्हैस दगावली तर लोहारा शहरातील झिंगाटे प्लॉट मध्ये घरासमोर झाड पडुन कारचे नुकसान झाले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांद्यासह फळपिकांचे व भाजीपाल्याचे देखील नुकसान झाल आहे तर अनेक भागता विजपुरठा खंडीत झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर तडे – अपघाताचा धोका वाढला, तातडीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची मागणी..

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला-आर्णी १६१ या राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठे तडे गेले असून, हे तडे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी लवकरात लवकर या महामार्गाची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली...काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळी ची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झालाय.

Maharashtra News Live Updates : जालन्यात सलग चार दिवसापासून अवकाळीचा कहर, पुढील चार दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील झाडे उखडून पडली आहे. जिल्ह्यात विज पडून दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहे. जालन्यातील सराटे वझर शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे उकडून पडली आहे तर भोकरदन तालुक्यातील भायडी शिवारात वीज पडून रामदास फड यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे तर केदारखेडा येथील राहुल जाधव या तरुणाचा देखील वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील चार दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय तर पुढील चार दिवस हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.