पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’राबवत हिशेब चुकता केला. भारतीय वायू सेनेने पाकच्या आत मुसंडी मारीत ७ मे रोजी अतिरेक्यांचे नऊ तळ उद्धवस्थ केले. त्यानंतर ९ मे रोजी पुन्हा भारताने एअर स्ट्राईक केला.या राफेल वाराने भेदरलेला पाकिस्तान आता ५ व्या पिढीची चीनी बनावटीची J-35 ही स्टिल्थ फायटर जेट विमानांचा ताफा खरेदी करण्याचा करार करणार आहे. चीनचा दावा आहे की ही विमाने रडारला चकवा देतात त्यामुळे पाकिस्तानची मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.पाकिस्तानी वायू सेनेचे माजी एअर कमांडर जिआ उल हक शम्सी यांनी दावा केला आहे की J-35 A फायटर जेटच्या खरेदीने पाकिस्तानची हवाई ताकद भारताच्या १२ वर्षे पुढे जाणार आहे.
चीनचे हे J-35 A फायटर झिन्यांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने बनवले आहे. चीनकडे सध्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान जे-२० मायटी ड्रॅगन आहे. ते सध्या चिनी सैन्याकडे आहे. तर J-35A इतर देशांना विक्रीसाठी बनविण्यात आले आहे. पाकिस्तानी हवाई दलाला आता ही लढाऊ विमाने लवकरात लवकर त्यांच्या वायूदलाच्या ताफ्यात हवी आहेत..
पाकिस्तान अशी ४० लढाऊ फायटर जेट विमाने खरेदी करणार आहे; या वर्षी त्यांना पहिला ताफा मिळणार असल्याचा असा दावा केला जात आहे. ही स्टेल्थ लढाऊ विमाने रडारला चकमा देऊ शकतात. यामुळे पाकिस्तानी हवाई दलाची मारक शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. निवृत्त पाकिस्तानी हवाई दलाचे अधिकारी एअर कमोडोर झियाउल हक शम्सी यांनी हा दावा केला आहे. शम्सीचा दावा आहे की J-35A विमानांचा ताफा पाकिस्तानच्या हवाई शक्तीला भारतापेक्षा १०-१२ वर्षे पुढे नेणार आहे.
कॉम्बॅट एअर फोर्सचा भाग असलेले पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही सांगितले की, हे लढाऊ विमान पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ दलाचा एक भाग असेल. J-35A करारासाठी खरेदी करण्या संदर्भातला वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. पाकिस्तानला विमानांची संपूर्ण ताफा दोन वर्षांत टप्प्या टप्प्याने मिळू शकणार आहे.
झुहाई एअर शो दरम्यान चीनने प्रथम J-35A लढाऊ विमानाचा पॉवर डिस्प्ले प्रदर्शित केला होता. चिनी हवाई दलाच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त या बहुउद्देशीय लढाऊ विमानाने आपली कलाबाजीचे प्रदर्शन केले होते. तथापि, J-35A हे चिनी सैन्याकडे असलेल्या J-20 लढाऊ विमानापेक्षा आकाराने लहान आहे. चिनी सैन्याकडे २०० जे-२० लढाऊ विमाने आहेत. J-35A हे अमेरिकेच्या F-35 ची डुप्लिकेट कॉपी असल्याचेही म्हटले जाते. F-35 प्रमाणे त्याचे पंख आणि शेपटी लहान असल्याने आकाशात त्याचे संतुलन चांगले असते. हे दोन इंजिन असलेले विमान स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज आहे.