महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची चर्चा, आज राजभवनावर शपथविधी
Marathi May 20, 2025 08:24 AM

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. राजभवनावर उद्या सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याची निमंत्रणे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्वांना पाठवली आहेत.

बीड येथील संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्या खात्याचा प्रभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. ते खाते भुजबळांकडे सोपवले जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आमदार डॉ. संजय कुटे यांनाही मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.