SBI चा ग्राहकांना पुन्हा धक्का, एफडीवरील व्याजदरात केली ०.२० टक्के कपात
ET Marathi May 20, 2025 01:45 PM
मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने आपल्या बहुतेक एफडीवरील व्याजदरात ०.२० टक्के कपात ( SBI cut fd rate) केली आहे. हे व्याज ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर आहे. एसबीआयचे नवीन दर १६ मे पासून लागू झाले आहेत. आरबीआयने दोनदा रेपो दर कमी केल्यानंतर बहुतेक बँका एफडीवरील व्याज कमी करत आहेत.एसबीआय ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते. बँक ज्येष्ठ नागरिकांना ५ ते १० लाख रुपयांच्या एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहे. या एफडीवरील व्याज ७.३० टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन एफडी व्याजदर७ दिवस ते ४५ दिवस: सर्वसामान्यांसाठी - ३.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ४ टक्के४६ दिवस ते १७९ दिवस: सर्वसामान्यांसाठी - ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.०० टक्के१८० दिवस ते २१० दिवस: सर्वसामान्यांसाठी - ६.०५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.५५ टक्के२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी - ६.३० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.८० टक्के १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी - ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.०० टक्के२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी - ६.७० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.२० टक्के३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी – ६.५५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ७.०५ टक्के५ वर्षे ते १० वर्षे: सर्वसामान्यांसाठी – ६.३० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - ७.३० टक्के.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.