परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा,शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,पिक विमा योजनेतील बदल रद्द करण्यात याव या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांकडे करण्यात आल्या आहेत.जर लवकरात लवकर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Marathi News Live Updates: काळजी नसावी! कोविड ची लाट चिंताजनक नाही, आरोग्यतज्ञांचे मतहाँगकाँग, सिंगापूर मध्ये कोव्हिड ची संख्या वाढत आहे पण भारतात जेव्हा कोविड लाटा आल्या तोपर्यंत भारतीयांनी लस घेतल्या होत्या. गंभीर लाट आता येणार नाही, लॉकडाऊन चा प्रश्न सोडून द्या, पावसाळा आणि हिवाळा येतोय त्यावेळी फक्त व्हायरल इन्फेक्शन वाढतात त्यावेळी आपण सावधानता बाळगावी अशी माहिती सी एस आय आर चे माजी महा निरीक्षक डॉ शेखर मांडे यांनी दिली आहे. व्हायरस मध्ये भरपूर mutation होत असतात त्यामुळे या कोविड विषाणूचे mutants येताच राहणार पण त्याचे परिणाम फारसे गंभीर नसणार असं ही डॉ मांडे म्हणाले.जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी केली नवसपूर्ती
जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी आपला नवस पूर्ण केलाय. पती आमदार झाले तर केस दान करेल असा नवस सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला केला होता. त्यानुसार अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालना विधानसभेचे आमदार झाल्याने सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला जाऊन आपला केसदान करण्याचा नवस पूर्ण केलाय. यावेळी खोतकर पती पत्नीने तिरुपती बालाजी येथे जाऊन भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आपली मानता पूर्ण केलीय. दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे जालन्यावर अन्याय होऊ देणार नाहीत अस म्हणत आमदार अर्जुन खोतकर मंत्री झाल्यास जनतेचे कामं आणखीन चांगल्या प्रकारे करता येतील अशी इच्छा सीमा खोतकर यांनी व्यक्त केली.
धुळ्यात पावसाची हजेरीकाही दिवसापासून पावसाचा अधून मधून जोर सुरू आहे आणि पुढील काही दिवसात पावसाळा देखिल सुरू होणार असून, शहरात विविध ठिकाणी कचरा साचलेला असताना त्याची साफसफाई धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे होत नसल्यामुळे हा सर्व कचरा सडून विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे,
Marathi News Live Updates: कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळलाकल्याण पूर्व मंगलराघो नगर परिसरातील धक्कादायक घटना
चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला ,थेट तळमजल्यापर्यत कोसळला
सप्तशृंगी असं इमारतीचे नाव
इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याची शक्यता
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल ,बचाव कार्य सुरू
सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंगविजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुरूय मुसळधार पाऊस
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला जारी केला आहे ऑरेंज अलर्ट
मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा
मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर
Tuljapur News: तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात आणखी एक आरोपी अटकतस्कर गटातील आरोपी नानासाहेब कुर्हाडे याला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील वांगणी येथुन घेतले ताब्यात
धाराशिव पोलिस एॅक्शन मोडवर, गेली तीन दिवसात तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एकुण 36 आरोपी असुन 18 जनाला अटक करण्यात आली असुन 18 जन फरार आहेत
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके तैनात
Pune News: पुण्यातील नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा घटलापुण्याच्या भोरमधील्या नीरा खोऱ्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरणानी घातला तळ,धरणात केवळ 8 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक
धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यानं पाणीसाठा झाला कमी
धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे धरणानी तळ गाठला असल्यानं धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागलयं
-24 टी एम सी एवढी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे.. त्यामुळं भोर,खंडाळा,पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतीला आणि गावांना या धरणातून होतो पाणी पुरवठा..
Yavatmal: अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार निकृष्ट दर्जाचा, मनसेचा आरोपयवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीत वय वर्ष सात महिने ते तीन वर्ष, तसेच गरोदर व स्तनदा माता यांना दिल्या जाणारा पाकीट बंद पोषण आहार निष्कृट दर्जाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून सदर कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.शासनाच्या वतीने पाकीट बंद मूग डाळ, तांदूळ पाकीट,तूर डाळ, मल्टीग्रेन गोड पिठाचा शिरा ही घटक दिली जाते.मात्र या पोषण आहारातून दुर्गंधी येत असल्यााचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला असून चांगल्या दर्जाचे पोषण आहार वाटप करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापूरे आणि देवा शिवरामवार यांनी केली आहे.
Nagpur News: नागपूरमध्ये जुन्या वैमनस्यातून मित्राकडून मित्राची हत्या..- फारुख उर्फ सोनू अमीन शेख मृतकाचे नाव असून सुनील सारंगपुरे आरोपीचे नाव आहे..
- घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला....पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे...
- मात्र दोघांमध्ये पुन्हा एकदा वादावादी झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर सुनीलने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने फारुखवर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
- यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सुनीलचा शोध सुरू आहे.
Kalyan: कल्याणच्या गांधारी ब्रिजवर भीषण अपघातरिक्षाला धडक देऊन डंपर ब्रिजचे कठडे तोडून नदीत कोसळला
अपघातात एका महिलेचा मृत्यू एक जण गंभीर जखमी
पसार झालेला डंपर चालक पोलीस ठाण्यात हजर
Anchor:- कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर डंपर ने रिक्षाला जोरदार धडक दिली .हा अपघात इतका भीषण होता की धडक दिलेला डंपर थेट नदीत कोसळला .या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे .जखमीला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
National Highway: राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चौघांचे प्राण वाचलेअकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे, हिंगोलीजवळ असलेल्या खानापूर ब्रिजच्या जवळ ही कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली आहे , एम एच 25 पासिंग असलेल्या या कारमध्ये दोन महिला सह इतर दोघेजण बसले होते मात्र कार
मधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच कालच्या चालकाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून कारची तपासणी तपासणी करायला सुरुवात केली दरम्यान याच वेळी अचानक गाडीने पेड घेतला आणि काही मिनिटाच्या आत ही गाडी जळून खाक झाली आहे,
Pune News: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आउटगोइंग बंद!पुणे महापालिकेचा रिचार्ज संपला?
सोमवारी दुपारी पालिकेतील अधिकाऱ्यांचे तब्बल ११०० मोबाईल चे आउटगोइंग बंद
बिल न भरल्याने पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात आलेले सर्व मोबाईल पडले बंद
एका खाजगी मोबाईल कंपनीकडून पुणे महापालिकेने तब्बल ११०० मोबाईल नंबर घेतले आहेत
हे सर्व नंबर पोस्टपेड असल्याने त्याचे बिल पुणे महापालिकेकडे आहे
गेल्या २ ते ३ दिवसांपासून या सर्व क्रमांकावर बिल न भरल्याने आउटगोइंग सेवा आणि इंटरनेट बंद होणार अशा सूचना मेसेज रूपी येत होत्या
Devendra Fadnavis: भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वन्य प्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर,एका एकरातील तिळ वन्य प्राण्यांनी केला फस्त- यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोसदणी शेतशिवारातील तिळ वन्य प्राण्यांनी फस्त केल्याचे समोर आले असून शेतकरी अमोल लक्ष्मणराव ठाकरे यांचे कोसदनी शेत शिवारात शेत आहे.दोन एकरात अमोल ठाकरे यांनी तिळ या पिकाची लागवड केली. परंतु वन्य प्राण्यांनी शेतातील हातातोंडाशी आलेला एक एकरातील तिळ पूर्ण फस्त केल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शिंदेसेनेचे ओबीसी व्हिजेएनटीचे अध्यक्ष यवतमाळातस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. अशात शिवसेना शिंदेगटाचे ओबीसी व्हिजेएनटीचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे हे यवतमाळात दाखल झाले असून यावेळी ते भटक्या विमुक्त प्रवर्गातील समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.याशिवाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी ओबीसी व्हिजेएनटी चे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.
शिरूर तालुक्यातील चांडोह येथे ४५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीरशिकारीच्या हेतुने बिबट्याने शेतकरी महिलेवर हल्ला केला या हल्ल्यात महिलेच्या गळ्याला हाताला गंभीर जखमा झाल्यात महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असुन प्रकृती चिंताजनक आहे संगिता अंकुश शिंदे असं महिले चे नाव आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून दिवसा आणि रात्रीच्या वेळी नागरिकांचे घराबाहेर पडनं अवघड झाले असून या बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे असणार आहे...
अमळनेर येथे भरधाव चारचाकीची प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक..
भीषण अपघातात रिक्षामधील चालकाचा जागीच मृत्यू,
भटू पाटील असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे..
अमळनेरमधील मंगरूळ एमआयडीसी जवळ आज सकाळी सात वाजता हा भीषण अपघात झाला..
चारचाकी वाहनाची धडक एवढी जोरदार होती की अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.
जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक प्रा. जयंत विष्णु नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद मोहोळ हत्याप्रकरणी ओमकार मोरेला अटकशरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी
फरार असलेल्या ओकांर मोरे याला रात्री अटक करण्यात आली.
त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पुर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली आहे.
युनिट दोन ने केली कारवाई
देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला--उपमुख्यमंत्री अजित पवार“जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Pune News: छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यात जल्लोषपुण्यातील महात्मा फुले वाड्यात पेढे वाटत,ढोल ताशा वाजवत जल्लोष
ओबीसी समाजाकडून पुण्यातील समता भूमी येथे जल्लोष
राज्य मंत्रिमंडळात भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर पुण्यातील ओबीसी समाजाकडून आनंद व्यक्त
Baramati: इंदापुरातील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचे वर्चस्व21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी..... श्री छत्रपती कारखान्यावर श्री जय भवानी माता पॅनलची एक हाती सत्ता
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
Dharashiv News: ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद, धाराशिव मध्ये जल्लोषओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळाल्याबद्दल धाराशिव शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करत भुजबळ यांना मंञीपद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Washim News: वादळी वाऱ्यात वीज वितरणचे 12 पोल वाकले, 20 गावचा विद्युत पुरवठा खंडितवाशिम जिल्ह्यातील किनखेडा, लिंगापेन, शेलगाव, मसलापेन आणि परिसरात रात्रीच अवकाळी वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे 33 केव्ही वीज वाहिन्यांचे तब्बल शेतातील 12 पोल वाकले आहेत. त्यामुळे केशवनगर आणि मागुळ झनक येथील सबस्टेशन्स गेल्या 13 तासांपासून बंद आहे.
Nashik: नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा जल्लोष- छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भुजबळ समर्थकांचा जल्लोष
- नाशिकच्या भुजबळ फॉर्मवर भुजबळ समर्थकांचा जल्लोष
- फटाक्यांची आतषबाजी करत भुजबळ समर्थकांचा जल्लोष
- एकमेकांना पेढे भरवत व्यक्त केला भुजबळांना मंत्री पद मिळाल्याचा आनंद
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीआज राजभवनात छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
Jayant Naralikar: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच पुण्यातील राहत्या घरीआंतररष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञनकथा लिहीण्यासाठी देखील लोकप्रिय होते.
केंब्रीज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले .
आधी टाटा मुलभुत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहीला.
२०२१ मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
छगन भुजबळ यांना उशिरा का होईना स्थान दिलं त्याबद्दल सरकारचे स्वागत- लक्ष्मण हाकेसरकारमध्ये छगन भुजबळ यांना उशिरा का होईना स्थान दिलं त्याबद्दल सरकारचे स्वागत
ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता
पण ओबीसी आरक्षण हा येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा विषय ओबीसी नेत्यांसमोर असणार आहे
भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातील समावेश येतो झाकी है पुढे जाऊन जयंत पाटील ,रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळात समावेश महाराष्ट्राला येत्या काळात पाहायला मिळेल
ओबीसी प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी समाजाशी आहे
Ujani: उजनी धरणातून कुरुलच्या डाव्या कालव्यातून सीना नदीत पोहोचलं पाणी- दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सीना नदीत उजनीतून तिसरा आवर्तन आलं सोडण्यात
- दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती मागणी
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सीना नदीत उजनीतून पाणी सोडावे या मागणीसाठी पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन येथे केलं होतं आंदोलन
- दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील बंधारे पाण्यामुळे भरले जाणार
Nashik News: नाशिकच्या भुजबळ फार्माबाहेर छगन भुजबळांचे बॅनर झळकलेनाशिकच्या भुजबळ फार्मबाहेर कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ विराजमान झाल्याचे होर्डींग्स झळकले आहेत. भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्याने काही दिवसांपासून भुजबळ समर्थकांकडुन अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आज होर्डींग्सवर पुन्हा अजित पवार बघायला मिळतायत.
Washim News: वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर साचले पाण्याचे डबके; सार्वजनिक बांधकाम विभागाच दुर्लक्ष...वाशिम शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा न्यायालयाकडे कडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचल्याने पाण्यामुळे रस्ताला डबक्यांच स्वरूप आले आहे. याच रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे नगर परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळे झाक करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे..
Sangli News: सांगलीत हळद लागवडीचा हंगाम जिल्ह्यात सुरूसांगली जिल्ह्यात हळद लागवड हंगामास सुरुवात झाली आहे. 15 मे पासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळदीची लागवड केली जाते. गत दोन वर्षाच्या तुलनेत हळदीच्या दरात घसरण असूनही पीक लागवडीत काही शेतकऱ्यांनी सातत्य ठेवले आहे. सांगलीतील शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. हळद लागवड करण्यासाठी मे ते जून हा कालावधी खरीप हंगामातच योग्य मानला जातो. या काळात हळद फुटायला चांगला कालावधी मिळतो. या काळात हवामान उष्ण आणि दमट असते. ज्यामुळे पिकाला वाढीस मदत होते. हळदीच्या उगवणीसाठी सरासरी 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असले तरी चांगला फुटवा फुटतो. हळदीच्या लागवडीसाठी कंद वापरले जाते. डिसेंबर, जानेवारी मध्ये हळदीची कापणी केली जाते. त्यामुळे या काळात बियाणे खरेदी करणे योग्य असते.
Mumbai Accident: मुंबई वरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा अपघातविक्रोळी मधील नारायण बोधे ब्रीज जवळ अपघात
पहाटे सहा वाजून चाळीस मिनिटाने झाला अपघात
टेम्पो आणि टाटा सफारी दोनही गाडया पलटी
टेम्पो ने धडक दिल्याने टाटा सफारी ही दुसऱ्या मार्गाकडे जाऊन पलटी
दोन्ही गाड्या मधील चालक किरकोळ जखमी जखमींना आंबेडकर रुग्णालयात दाखल
दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापक आणि विक्रोळी पोलीस दाखल
Nagar News: उत्तर नगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटकाकाल सायंकाळी उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालय.. विशेतः अकोले, संगमनेर, राहाता आणि राहुरी या तालुक्यांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय.. झाडांच्या पडझडीमुळे अनेक ठिकाणी विज देखील पुरवठा खंडित झाला आहे..
राहाता तालुक्यात काही ठिकाणी मोठमोठी झाले उन्मळून पडली तर अनेक दुकानांचे पत्रे उडून गेलेत.. राहाता परिसरात काल सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे..
Buldhana News: बुलडाण्यात घरगुती गॅस ऑटोमध्ये भरण्याच्या व्यवसायावर पोलिसांची धाडबुलडाणा -
खामगावात अवैधरीत्या घरगुती गॅस ऑटोमध्ये भरण्याच्या व्यवसायावर पोलिसांची धाड
आरोपी घटनास्थळावरून झाला फरार , पोलिसात गुन्हे दाखल
ॲपेसह, 20 सिलिंडर, कॉम्प्रेसर मशीन व इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी केला जप्त
Nagpur News: राज्यातील परिवहन विभागातील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेशनागपूर -
- राज्यातील परिवहन विभागातील एकाच वेळी १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश.
- एकट्या विदर्भातील ४२ निरीक्षकांचा समावेश.
- आवडीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक बदल्यांचे मेल धडकल्याने खळबळ.
- नवीन संगणकीकृत प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यानुसार या ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे यावर्षीही बदल्या करण्यात आले.