Maratha Manoj Jarange on Chhagan Bhujbal took oath as minister in Maharashtra Cabinet
Marathi May 20, 2025 10:25 PM


मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून मंगळवारी (20 मे) शपथ घेतली. यावेळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी ही अजित पवारांची मोठी खेळी मानली जात आहे. ओबीसीचे महत्त्वाचे नेते असलेले छगन भुजबळ यांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आमनेसामने आले आहेत. मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांन संपवण्याचा विडा घेतला आहे,” असे म्हणत टीका केली. (Maratha Manoj Jarange on Chhagan Bhujbal took oath as minister in Maharashtra Cabinet)

हेही वाचा : CM Fadnavis on Jayant Narlikar : विज्ञानाचा प्रसार करण्यात नारळीकरांची मोलाची भूमिका, काय म्हणाले मुख्यमंत्री?

मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, “जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्यांना मंत्रिपद दिले जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांला तात्पुरता नादी लावले असेल, चॉकलेट दिले असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याचे काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल.” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. “छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सर्व आमदारांनी करायला हवा होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या, हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असेही ते म्हणाले.

“मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणले, त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकले. काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे,” असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून संताप व्यक्त केला. “एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? असा सवाल दमानिया यांनी फडणवीसांना केला.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.