Video Viral: धोनीनं चिमुकल्याला केलं खूश; फोटोसाठी बॅरिकेट्सवरून उडी मारून पोहचला फॅन्सजवळ
esakal May 21, 2025 03:45 AM

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जगभरात पाहायला मिळते. सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतही त्याच्या लोकप्रियतेचा प्रत्येय येत आहे.

तो जेव्हाही मैदानात उतरतो तेव्हा स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा जोरदार गजर चाहते करताना दिसतात. विशेष म्हणजे फक्त चेन्नईच्या घरच्या मैदानावर नाही, तर तो कोणत्याही मैदानात गेला, तरी त्याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते स्टेडियमवर हजर असतात.

दरम्यान, नुकतेच धोनीचा एका चिमुकल्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चेन्नई संघ सध्या दिल्लीमध्ये आहे. आयपीएल स्थिगितीनंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर चेन्नईचा घरचा सामना दिल्लीला हलवण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी (१९ मे) चेन्नई सुपर किंग्सचा सराव पाहण्यासाठीही अनेक चाहते स्टेडियममध्ये आले होते. या दरम्यान धोनीनेही चाहत्यांना फार नाराज केलं नाही. त्याने एका चिमुकल्या चाहत्यासाठी बाऊंड्रीजवळ असलेल्या एलईडी बॅरिकेट्सवरून उडी मारली आणि त्याला भेटायला तो गेल्याचे दिसले. त्याने त्या छोट्या चाहत्यासोबत फोटोही काढला. धोनीची ही कृती पाहून चाहते खूश झाले होते. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.

४३ वर्षीय सध्या दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडच्या जागेवर चेन्नईचे नेतृत्व करत आहे. मात्र चेन्नईच्या संघासाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला ठरलेला नाही. त्यांना १२ सामन्यांमध्ये केवळ ३ सामनेच आत्तापर्यंत जिंकता आले आहेत. त्यामुळे ते यापूर्वीच आयपीएल २०२५ स्पर्धेच्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

आता चेन्नईचे दोन सामने बाकी आहेत. २० मे रोजी त्यांचा सामना दिल्लीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळवला जाणार आहेत. तसेच २५ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांचा अखेरचा सामना होणार आहे. दरम्यान, राजस्थान विरुद्धचा सामना जिंकून चेन्नईला शेवटच्या क्रमांकची नामुष्की टाळून ९ व्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.

एमएस धोनीची आयपीएल कारकिर्द

एमएस धोनीने २७६ सामने आयपीएलमध्ये खेळले असून २४ अर्धशतकांसह ५४२३ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून २०० बळी घेतले आहेत, हा एक विक्रम आहे. आयपीएल २०२५ मध्ये धोनीने १२ सामन्यांत १४० च्या स्ट्राईकरेटने १८० धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.