परतूर - तालुक्यातील सालगावात वीज पडून तरुण दगवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सालगाव शिवारात येथील युवक सुनील विलास गाढवे (वय-२५) नेहमीप्रमाणे शेतात गेलेला होता.सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पाऊस वीज वारा सुटला होता यात शेतात असताना सुनीलच्या अंगावर अचानक वीज पडली.
तसेच त्याच्यासोबत असनारा शेतमजूर सखाराम राऊत वय ५५ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल केले असता त्याला डॉक्टर यांनी मृत्यु घोषित केले.
सुनील गाढवे (वय-२७ वर्ष) हा एकुलता एक मुलगा होता तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला ५ बहिणी, बायको आणि एक आठ महिन्याचा मुलगा,आई वडील असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने गावामध्ये शुकाकुळाचे वातावरण पसरले आहे.उद्या बुधवारी सुनील वर गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.