'Touchi'ng Moment! वैभव सुर्यवंशी सामन्यानंतर MS Dhoni च्या पाया पडला, १४ वर्षाच्या पोरानं जिंकली मनं, Video Viral
esakal May 21, 2025 06:45 AM

IPL 2025 Chennai Super Kings vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये १४ सामन्यांत ४ विजय मिळवून स्पर्धेचा निरोप घेतला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला ६ विकेट्स व १७ चेंडू राखून सहज पराभव केला. चेन्नईच्या ८ बाद १८७ धावांचा त्यांनी १७.१ षटकांत ४ बाद १८८ धावा करून यशस्वी पाठलाग केला. वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि सामन्यानंतर तो चक्क महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) पाया पडला.

चेन्नई सुपर किंग्सकडून आयुष म्हात्रे ( ४३), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ४२) व शिवम दुबे ( ३९) यांनी दमदार खेळ केला, परंतु मधल्या फळीतील अपयशामुळे संघाला २०-३० धावा कमी करता आल्या. राजस्थानकडून युधवीर सिंग व आकाश मढवाल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत RR कडून यशस्वी जैस्वाल ( ३६) व वैभव ( ५७) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. संजू सॅमसन ( ४१) व वैभव यांनी ९८ धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने १२ चेंडूंत नाबाद ३१ धावा करून संघाचा विजय पक्का केला. शिमरोन हेटमायर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर वैभवने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पाया पडला.

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात ७ डावांत २५२ धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट २०७ होता. भारतीय खेळाडूने आयपीएल हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट (किमान २५० धावा) करणाऱ्यांमध्ये वैभवने अव्वल स्थान पटकावले.

  • २०७ – वैभव सूर्यवंशी (२०२५)*

  • २०४ – अभिषेक शर्मा (२०२४)

  • १९३ – प्रियांश आर्य (२०२५)

  • १९२ – अभिषेक शर्मा (२०२५)

  • १९१ – हार्दिक पंड्या (२०१९)

वयाच्या २० वर्षापूर्वी आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार
  • २४ - वैभव सूर्यवंशी (२०२५)*

  • २४ - रिषभ पंत (२०१७)

  • १७ - संजू सॅमसन (२०१४)

  • १७ - इशान किशन (२०१८)

  • १६ - तिलक वर्मा (२०२२)

संजू सॅमसन IPL मध्ये २००० धावा पूर्ण करणारा ८वा कर्णधार ठरला आहे.
  • ४,९९४ – विराट कोहली (१४२ डाव)

  • ४,७५३ – एमएस धोनी (२०४ डाव)

  • ३,९८६ – रोहित शर्मा (१५७ डाव)

  • ३,५१८ – गौतम गंभीर (१२७ डाव)

  • ३,३५६ – डेव्हिड वॉर्नर (८३ डाव)

  • २,६९१ – केएल राहुल (६४ डाव)

  • २,४२९ – श्रेयस अय्यर (८१ डाव)

  • २,०२१* – संजू सॅमसन (६६ डाव)

  • १,९०० – अॅडम गिलख्रिस्ट (७४ डाव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.