आयपीएल २०२५ स्पर्धेत रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाला १९ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला.
हा लखनौचा १२ सामन्यातील ७ वा पराभव ठरला. त्यांचे आता साखळी फेरीतील २ सामनेच बाकी असल्याने ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले.
लखनौला यंदाच्या हंगामात नवा कर्णधार रिषभ पंतच्या खराब कामगिरीचाही फटका बसला. रिषभला अपेक्षेनुसार फारशी कामगिरी करता आली नाही.
रिषभ पंतने १२ सामन्यांतील ११ डावात १३५ धावा केल्या. त्यात एकाच अर्धशतकाचा समावेश आहे.
रिषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
या किंमतीचा आणि त्याने या हंगामात पहिल्या १२ सामन्यात केलेल्या १३५ धावांचा विचार केला, तर त्याची एका धावेची सरासरी किंमत तब्बल २० लाख रुपये होते.
ही किंमत पाहाता रिषभ पंत लखनौसाठी महागडा ठरल्याचे दिसत आहे.
आता लखनौला अद्याप २ साखळी सामने खेळायचे असल्याने त्यात पंत चांगली कामगिरी करेल, ही अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आणि संघालाही असेल.