KFC सारखा चवदार चिकन पॉपकॉर्न आणि ड्रमस्टिक्स आता घरच्या घरी बनवा – झटपट आणि कुरकुरीत!
अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक्स,1 लिंबाचा रस,1 चमचा आलं-लसूण पेस्ट,1 चमचा लाल तिखट, ½ चमचा हळद, ½ चमचा जिरे-धणे पावडर,मीठ चवीनुसार
सर्व साहित्य एकत्र करून चिकन मॅरिनेट करा. *किमान 1 तास, पण 5 तास ठेवल्यास अधिक चवदार.
1 वाटी मैदा,1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर,1 चमचा लसूण पावडर,1 चमचा चिली फ्लॅक्स,मीठ चवीनुसार,पाणी.
वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ भिजवा. हे चिकनला कुरकुरीत बनवते.
मॅरिनेट केलेले चिकन या भिजवलेल्या मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या.
गरम तेलात चिकन ड्रमस्टिक्स मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तयार चिकन ड्रमस्टिक्स गरमागरम मेयॉनीज, सॉस किंवा तंदुरी चटणीसोबत सर्व्ह करा.
हीच रेसिपी वापरून छोट्या तुकड्यांतून स्वादिष्ट चिकन पॉपकॉर्नही बनवता येतो.