Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कोथिंबिरीची कचोरी, सोपी आहे रेसिपी
esakal May 22, 2025 02:45 PM

How to make coriander kachori at home: तुम्हाला सकाळी नाश्त्यात झटपट तयार होणारा आणि स्वादिष्ट पदार्थ हवा असेल तर कोथिंबिरची कचोरी तयार करू शकता. कोथिंबिरची कचोरी बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. कोथिंबिरची कचोरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

कोथिंबिरीची कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पारीसाठी- 2 कप मैदा

पाव चमचा सोडा

अर्धा चमचा मीठ

2 टेबलस्पून तेल

सर्व एकत्र भिजवा

सारणासाठी स्वच्छ धुऊन चिरलेली कोथिंबीर 1 कप

आलं व हिरव्या मिरच्या वाटून 2 चमचे

1 चमचा बडीशेप व अर्धा चमचा मेथी किंचित भाजून जाड कुटून

1 कांदा चिरून

मीठ

3 टेबलस्पून बेसन

1 चमचा आमचूर

कोथिंबिरीची कचोरी बनवण्याची कृती

तेलावर चिरलेला कांदा घाला. आलं, मिरच्या वाटलेल्या घाला. कोथिंबीर घाला. परता. मीठ, बडीशेपची पूड घाला. शेवटी बेसन घाला. वाफ येऊ द्या. सारण गार करा. पिठाची वाटी बनवून थोडं सारण भरून, कचोरीचा आकार द्या. तळून घ्या.

टीप

पीठ भिजवताना पालकाची प्युरी वापरल्यास कचोरी "हिरवी' दिसेल. टोमॅटोच्या गोड चरणीबरोबर द्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.