Atal Pension Yojana मध्ये पेन्शनची रक्कम वाढवता येणार, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
ET Marathi May 22, 2025 08:45 PM
मुंबई : निवृत्तीनंतर पेन्शनसाठी दुसरा कोणताही पर्याय नसलेल्यांसाठी अटन पेन्शन योजना (APY) ही एक उत्तम योजना आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजांनुसार दरवर्षी पेन्शनची रक्कम वाढवू शकता. तुमचे उत्पन्न वाढले असेल आणि तुम्हाला सुरक्षित निवृत्ती हवी असेल तर तुम्ही ५,००० रुपयांपर्यंतच्या पेन्शन श्रेणीत अपग्रेड करू शकता. सरकारची अटल पेन्शन योजना देशातील गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सुरक्षित वृद्धापकाळाचे एक मजबूत माध्यम बनली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत विक्रमी ७.६५ कोटी लोक सामील झाले आहेत. सरकारी हमी पेन्शन योजनाअटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही एक सरकारी हमी पेन्शन योजना आहे. यामध्ये तुम्हाला ६० वर्षांच्या वयानंतर दरमहा १००० ते ५,००० रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम तुमच्या योगदानावर आणि वयावर अवलंबून असते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतात. तुम्ही सुरुवातीला २००० रुपये मासिक पेन्शन निवडली असेल आणि आता ५००० रुपये पेन्शन हवे असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. योजनेत तुम्ही दर आर्थिक वर्षात एकदा पेन्शनची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. ही लवचिकता तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार पेन्शनची रक्कम वाढवण्यास किंवा कमी करण्यास मदत करते. खाते आणि योगदानाची माहिती कशी मिळेल?तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे अपडेट्स मिळत राहतील.तुम्ही APY मोबाईल अॅपद्वारे देखील खात्याची माहिती तपासू शकता.याशिवाय, वर्षातून एकदा तुमच्या पत्त्यावर प्रत्यक्ष विवरणपत्र पाठवले जाते. खात्यात पैसे नसतील तर तुमच्या खात्यात कपातीच्या तारखेला पुरेशी शिल्लक नसेल, तर ती डिफॉल्ट मानली जाईल. अशावेळी तुम्हाला पुढच्या वेळी व्याजासह योगदान द्यावे लागेल. बराच काळ पैसे जमा झाले नाहीत तरी खाते बंद होत नाही. तुम्ही थकबाकीची रक्कम आणि व्याजासह ते पुन्हा सक्रिय करू शकता. गुंतवणूक कुठे केली जाते?तुमचे योगदान एसबीआय पेन्शन फंड, एलआयसी पेन्शन फंड आणि यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स सारख्या सरकारी मान्यताप्राप्त पेन्शन फंडांमध्ये गुंतवले जाते. पीएफआरडीए गुंतवणुकीवर लक्ष ठेवते आणि नियम ठरवते.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.