200 रुपयांची बियर फक्त 50 रुपयांना मिळणार, इतकी स्वस्त बियर मिळण्याचं नेमकं कारण काय?
Marathi May 23, 2025 12:26 AM

बिअर: बिअर प्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता देशात विकली जाणारी ब्रिटिश बिअर 75 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार आहे. बियर इतकी स्वस्त होण्याचं नेमकं कारण काय? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. भारत आणि ब्रिटनमधील एफटीए अंतर्गत आयात शुल्क कमी करण्याचा करार झाला आहे. त्यानंतर देशात विकल्या जाणाऱ्या ब्रिटिश बियर आणि स्कॉचच्या किंमतीत लक्षणीय घट होणार आहे.

आता 200 रुपयांची ही परदेशी बियर फक्त 50 रुपयांना मिळणार आहे. भारत आणि ब्रिटनमधील एफटीए करारात, स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कही निम्म्याने कमी करण्यात आले आहे. त्याच वेळी, ब्रिटिश गाड्यांवरील आयात शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. तर ब्रिटनने भारतीय कापड आणि चामड्याच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे.

ब्रिटिश बिअरवरील कर किती कमी केला?

एफटीए प्रमाणेच, भारत आणि ब्रिटनमध्ये अलीकडेच एक करार झाला आहे. ज्यामध्ये ब्रिटिश बिअरवरील आयात शुल्क 150 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा थेट फायदा बियर प्रेमींना होईल. पूर्वी 200 रुपयांना विकली जाणारी ब्रिटिश बियर आता फक्त 50 रुपयांना खरेदी करता येईल. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आयात शुल्कात ही कपात करण्यात आली आहे. एफटीए अंतर्गत झालेल्या या करारामुळे देशात ब्रिटिश बिअरची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. भारत आणि ब्रिटनमधील एफटीए करारात स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कही निम्म्याने कमी करण्यात आले आहे. त्याच वेळी, ब्रिटिश गाड्यांवरील आयात शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. तर ब्रिटनने भारतीय कापड आणि चामड्याच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे.

अनेक ब्रिटिश बिअर कंपन्या भारतात व्यवसाय करतात, ज्यांच्या किमती येत्या काळात 75 टक्क्यांनी कमी होतील. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला टेनेंट्स, जॉन स्मिथ, कोब्रा, न्यूकॅसल ब्राउन अले आणि मार्स्टन सारखे ब्रिटनचे बिअर ब्रँड पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त मिळतील.

भारतीयांचे आवडते बिअर ब्रँड कोणते?

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडमध्ये किंगफिशर, बिरा, हनी केन, कॉसबर्ग, कोरोना इत्यादींचा समावेश आहे. या सर्व बिअर ब्रँडची किंमत दिल्ली-एनसीआरमध्ये 120 ते 150रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा ब्रिटीश बिअर ब्रँडवर 150 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क होते, तेव्हा ते खूप महाग होते. परंतू, आता ब्रिटीश बिअरवरील आयात शुल्क 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यानंतर ब्रिटीश बिअर कंपन्या भारतीय बिअर ब्रँडशी स्पर्धा करू शकतील.

महत्वाच्या बातम्या:

कार्ल्सबर्ग की किंगफिशर? लोक कोणती बिअर जास्त पितात? वर्षभरात 323 कोटी बाटल्यांची विक्री

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.