धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील आमदाराच्या सहाय्यकाच्या खोलीमध्ये दहा कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा भांडाफोड माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. या खोलीबाहेर गोटे यांनी ठिय्या केला तर शिवसैनिकांनी या खोलीला टाळे लावले. बुधवारी रात्री उशिरा येथे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाखल झाले. त्यांच्या समक्ष खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा तेथे रोकड आढळली.