Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
esakal May 22, 2025 04:45 PM

नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ‘बनावटगिरी करत भारतीय नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप असलेल्या पूजा यांनी कुणाचीही हत्या केलेली नाही.

त्या ड्रग माफिया अथवा दहशतवादी नाहीत,’ अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान केली. ‘खेडकर यांनी सर्व काही गमावले आहे, त्यांना आता नोकरी देखील मिळणार नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधातील तपास लवकर पूर्ण करावा,’ असे निर्देश न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले.

ओबीसी आणि दिव्यांग श्रेणीतील आरक्षणाचा गैरमार्गाने लाभ घेत आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा गंभीर आरोप खेडकर यांच्यावर आहे. खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत न्यायालयाने त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. ‘आरोपीने कोणता गंभीर गुन्हा केला आहे, त्याने हत्या केलेली नाही.

त्या ड्रग माफिया अथवा दहशतवादीही नाहीत. तुमच्याकडे एखादी प्रणाली अथवा सॉफ्टवेअर असायला हवे. तुम्ही लवकर तपास पूर्ण करा,’ असे खंडपीठाने पोलिसांना सुनावले. सदर प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयाने खेडकर यांना जामीन द्यावयास हवा होता, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदविले. यावर पोलिसांच्या वकिलांनी खेडकर यांच्याविरोधात आरोप आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.