गांधीनगर : गुजरातमध्ये आशियाई सिंहांच्या संख्येत गेल्या पाच वर्षात विक्रमी वाढ झाली आहे. मे महिन्यात केलेल्या गणनेनुसार, सिंहांची संख्या ८९१ झाली असून ती २०२० मध्ये ६७४ होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंहांची संख्या २१७ ने संख्या वाढली आहे.
यासंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी माहिती दिली आहे. सिंहांची व्याप्ती केवळ जंगलापुरतीच नसून संपूर्ण सौराष्ट्रातील अकरा जिल्ह्यात सिंहांची लक्षणीय वाढ झाली आहे. यात जंगलाशिवाय किनारपट्टीचा भाग आणि वन नसलेल्या भागातही सिंहांच्या संख्येतील वाढ नोंदली आहे.
गुजरातच्या वनविभागाचे प्रमुख जयपाल सिंह म्हणाले, गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यप्राणी अभयारण्यात ३८४ सिंह आढळून आले तर ५०७ सिंह अभयारण्याबाहेरच्या परिसरात निदर्शनास आले आहेत. याचाच अर्थ सिंहांची संख्या गीर अभयारण्याबाहेरही वाढत असल्याचे दिसून येते.
गणना कधी१० मे ते १३ मे २०२५ या काळात दोन टप्प्यात सिंहांची गणना ३५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात करण्यात आली. यात ११ जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासणी १० ते ११ मे रोजी करण्यात आली आणि अंतिम गणना १२ ते १३ मे दरम्यान करण्यात आली. यात तीन हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.
यात प्रादेशिक, विभागीय, सहायक उपविभागीय, गणना, निरीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश होता. गणना अचूक करण्यासाठी ’डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन’ नावाची प्रणाली वापरण्यात आली आणि त्यात त्रुटी राहण्याचे प्रमाण शून्यच असते आणि शंभर टक्के अचूकता राहाते. राज्यात वनविभागाकडून दर पाच वर्षाला सिंहांची गणना केली जाते.
सौराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांत सिंहजुनागड, गीर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोर्बी, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर, बोटाद
पाच वर्षांत ६७४ वरून ८९१ वर संख्या
भावनगर
जिल्ह्यात एका
कळपात १७ पेक्षा
अधिक सिंह
आढळून आले.
सिंह
१९६
सिहिंण
३३०
२०२०
एकूण सिंह
६७४
एकूण वाढ
२१७
तरुण सिंह
१४०
छावा
२२५