लग्न, लग्नासाठी घरच्यांची धडपड आणि मुलीचा आलेल्या स्थळाला नकार या सगळ्या गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मात्र कुटुंबाची जबाबदारी ही या क्षणी तितकीच महत्त्वाची असते. तर मुलांची मनही यावेळी जपणे महत्त्वाची असतात. या मनस्थितीत अडकलेली एक नवी कोरी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. मराठी अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचा मराठी चित्रपट 'म्हणजे वाघाचे पंजे'चा धमाकेदार ट्रेलर (Mhanje Waghache Panje Trailer) रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे.
'म्हणजे पंजे' चित्रपटाच्या समोर आलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. संजय नार्वेकर, दिपाली सय्यद या कलाकारांचा अभिनयाची भन्नाट झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना बांदेकर तिच्या सुंदरतेने, अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतेय. अर्थात चित्रपटात तमन्नावर लग्नाबाबत आलेल संकट ती कशी हाताळणार, आईच्या म्हणण्यानुसार ती लग्न करणार की स्वतःच्या मनाजोगा जोडीदार निवडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
'म्हणजे वाघाचे पंजे' स्टारकास्टअभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण होणार आहे. या चित्रपटात सौरभ गोखले, निखिल चव्हाण, नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, , प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत याने सांभाळली आहे. चित्रपटाला संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नार्वेकर यांनी बाजू सांभाळली आहे. 'म्हणजे वाघाचे पंजे' हा कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट 30 मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.