सेनापती कापशीतील शिबिरात
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
सेनापती कापशी, ता. २२ ः महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने युवक व युवतींसाठी येथे चार दिवसाचे प्रतापी संस्कार शिबिर झाले. काकडा, प्राणायाम, ग्रंथवाचन, चर्चासत्र, व्याख्यान, हरिपाठ, कीर्तन असे उपक्रम झाले.
शिबिरातील चर्चासत्रात व्यसनमुक्ती काळाची गरज, मोबाईल शाप की वरदान, करिअर म्हणजे काय, आदी विषयावर चर्चा झाली. प्रमोद भापकर यांनी सर सेनापती संताजी घोरपडे यांचा जाज्वल्य इतिहास मांडला. किशोर काळोखे, अवधूत पाटील, डॉ. संजीवनी पाटील, गुरुप्रसाद जोशी, शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांची व्याख्याने झाली.
विठ्ठल महाराज कंधारे, गोविंद महाराज शिंदे, केशव महाराज मुळीक, मंगेश महाराज देशमुख आदींचे कीर्तन झाले. यावेळी संघटनेच्या वतीने दिला जाणारा मानाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संजय शिवदे यांना बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते देण्यात आला. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार समाजसेविका श्रीमती जयश्रीताई देशपांडे, राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित पुरस्कार जगन्नाथ शिंदे यांना देण्यात आला. उद्योगरत्न पुरस्कार पवन घाडगे, कृषिरत्न पुरस्कार विठ्ठल सानप, क्रीडारत्न पुरस्कार केशव गावडे यांना देऊन गौरविण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, गुरुप्रसाद जोशी, डॉ. प्रवीण पाटील यांनी संस्कार सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी दीपक जाधव, नवनाथ मालुसरे, योगेश जाधव, विलास जवळ उपस्थित होते.