देसाई यांचा पुरस्काराने गौरव
मालाड, ता. २२ (बातमीदार) ः आंतरराष्ट्रीय महिला मेरीटाइम दिनानिमित्ताने हॉटेल ताज, सांताक्रूझ येथे एक आगळावेगळा सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते कल्पना देसाई यांना मेरीटाइम क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘सागर में सन्मान’ प्रदान करण्यात आला. देसाई या मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी दीर्घकाळापासून मेरीटाइम क्षेत्रात विविध पदांवर सेवा केली आहे. या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देसाई यांनी आभार मानले.