पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम गावात घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यूमागे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेला मानसिक आणि शारीरिक छळ कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात आता राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेने, मयूरी हगवणेने, धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे.
मयूरी हगवणेचे धक्कादायक खुलासेमयूरी हगवणेने सांगितले की, वैष्णवीला सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ सहन करावा लागला. “वैष्णवी खूप घाबरायची. ती मृदू आणि शांत स्वभावाची होती. तिचा मोबाइल काढून घेतला जायचा, गर्भवती असताना तिला उन्हात उभं केलं जायचं, आणि तिचा पती शशांकने तिला मारहाण केल्याचे मी कामगारांकडून ऐकलं,” असे मयूरीने सांगितले.
ती पुढे म्हणाली, “माझी नणंद करिश्मा हिच्यामुळे सगळं घडलं. तिला आमचं कौतुक पाहवत नव्हतं. सासू-सासरे बाजूला असले, तरी करिश्माच्याच म्हणण्यानुसार सगळं चालायचं.” मयूरीने स्वतःवरही झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला. ती म्हणाली, “मला सासू, नणंद आणि दिराने मारहाण केली होती. माझा फोन हिसकावून पळून गेले. मी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, पण सुरुवातीला तक्रार नोंदवली गेली नाही.”
पोलिस कारवाई आणि राजकीय दबाववैष्णवीच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी, बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. मात्र, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे अद्याप फरार होते.
मयूरीने सांगितले की, तिच्या पतीचा, सुशील हगवणेचा, या प्रकरणात सहभाग नाही, आणि त्याचे नाव केवळ इतर आरोपींच्या संगनमतामुळे गुन्ह्यात समाविष्ट झाले आहे. ती म्हणाली, “माझ्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते, तर वैष्णवीचे प्रकरण घडलेच नसते.”
महिला आयोग आणि अजित पवार यांचा हस्तक्षेपराष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वैष्णवीच्या 10 महिन्यांच्या बाळाला तिच्या माहेरच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या बाळाला निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे ठेवण्यात आले होते, ज्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप आहे.
टायरमध्ये घालून मारायांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले असून, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केले. “माझ्या कार्यकर्त्याने चुकीचे काम केले, तर त्याला टायरमध्ये घालून मारा,” असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून तात्काळ अटकेचे निर्देश दिले. आज सकाळी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनी अटक करण्यात आली.
मयूरीने सांगितले की, वैष्णवीच्या मृत्यूने तिला स्वतःच्या तक्रारी पुढे नेण्याची ताकद दिली आहे. “मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहे. पोलिस योग्य कारवाई करतील आणि दोषींना शिक्षा होईल,” असे तिने ठामपणे सांगितले.