चहा पिणे कोणाला नाही आवडत, तो तर आपला जीव की प्राण
पण अयोग्य वेळेस चहा प्यायल्याने अपचन, मळमळ आणि बरेच त्रास होऊ शकतात
उपाशी पोटी चहा पिल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अॅसिडिटी, मळमळ, गॅस आणि अपचन होऊ शकतं.
चहामध्ये असलेलं कॅफिन तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतं. त्यामुळे झोपण्याच्या 3-4 तास आधी चहा पिणं टाळावं अन्यथा निद्रानाश, बेचैनी आणि थकवा जाणवतो.
चहा शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतो आणि किडनीवर लघवी निर्माण करण्याचा ताण येतो. त्यामुळे रात्री उशिरा चहा घेतल्यास झोपमोड होण्याची शक्यता असते.
चहा मध्ये असणारे टॅनिन्स लोह (Iron) चे शोषण अडवतात. त्यामुळे जेवणाच्या आधी किंवा लगेच नंतर चहा घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळत नाहीत.
चहा आरोग्यास फायदेशीर असला तरी चुकीच्या वेळी घेतल्यास तो त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे योग्य वेळेची निवड महत्त्वाची आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.