Asim Munir : पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरचे भारतीय कनेक्शन; जालंधर शहरातून कसे मिळाले शत्रू राष्ट्राला तीन जनरल
GH News May 23, 2025 07:17 PM

पाकिस्तान लष्कराचा फील्ड मार्शल असीम मुनीर याचे भारतातील जालंधर या शहराशी कौटुंबिक संबंध आहेत. स्थानिकांच्या दाव्यानुसार, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील फाळणीपूर्वी त्याचे कुटुंबिय जालंधर या शहरात राहत होत. या शहरातील काजी मोहल्लामध्ये मुनीर कुटुंबिय राहत होते. फाळणीनंतर हे कुटुंब रावळपिंडीला गेले. तिथेच असीम मुनीर याचा जन्म झाला.

पाकिस्तानातील अनेक सत्ताधारी आणि लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भारताशी थेट संबंध आहे. त्यांचे कुटुंबिय भारतातूनच पाकिस्तानमध्ये गेले होते. मुनीर पण त्याला अपवाद नाही. मुनीरचे शिक्षण रावळपिंडीत झाले. तो पुढे लष्करात गेला. एक एक पद पुढे सरकत तो आता पाकिस्तानचा लष्कर प्रमुख झाला आहे. पोकळ धमक्या देण्यात त्याने अनेकांच्या हातावर हात मारला आहे. तो पाकिस्तानचा वादग्रस्त लष्कर प्रमुख ठरला आहे.

मुनीरचे वडील होते शिक्षक

मुनीरचे वडील जालंधर येथे शिक्षक होते. त्याचे वडील स्थानिक मस्जिदीच्या विविध कार्यक्रमात भाग घेत. हे कुटुंब धार्मिकदृष्ट्या कट्टर होते. पाकिस्तान निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाशी पण त्यांचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. त्याविषयीचा पुरावा नाही. पण फाळणीवेळीच हे कुटुंब रावळपिंडीला रवाना झाले होते.

अनेक कुटुंब पाकिस्तानला

माध्यमातील बातम्यानुसार, काजी मोहल्ला आणि किला मोहल्ला हे शेजारी शेजारी होते. स्थानिक 79 वर्षीय हरप्रीत यांच्या मते 1947 च्या फाळणी वेळी अनेक कुटुंब काजी मोहल्ला सोडून पाकिस्तानला निघून गेले. त्यात मुनीर यांचे कुटुंब पण होते. रावळपिंडीत गेल्यावर मुनीरचे वडील मुख्याध्यापक झाले. एका स्थानिक मशिदीचे ते इमाम झाले. ते धार्मिक आणि शिस्तप्रिय असल्याचे सांगण्यात येते. विशेष पाकिस्तानमध्ये गेल्यावर सुद्धा ते जालंधरमधील त्यांच्या मित्रांच्या संपर्कात होते. काजी मोहल्लाशी संबंधित माहिती ते घेत असत.

जनरल याह्या खान याचे कुटुंब फाळणीपूर्वी अमृतसर आणि लुधियाना शहरात राहत होते. तर जनरल गुल हसन खान याचे पूर्वज करनाल आणि दिल्ली शहरात राहत असे. जनरल टिक्का खान याचा जन्म जालंधर शहरात झाला होता. या टिक्का खान यालाच 1971 च्या युद्धात ‘बुचर ऑफ बंगाल’ म्हटले जात असे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.