Glowing Skin : त्वचा उजळवण्यासाठी वापरा बदाम पावडर
Marathi May 23, 2025 07:25 PM

स्वच्छ, चमकदार त्वचेसाठी बाजारातील अनेक महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण, त्वचा उजळवण्यासाठी दरवेळेला बाजारातील महागडे प्रॉडक्ट्स वापरणे किंवा पार्लरला जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता. यात त्वचा उजळवण्यासाठी तुम्हाला बदामाची पावडर वापरणे फायद्याचे ठरेल. बदाम पावडरमधील व्हिटॅमिन ई, ऍटी-ऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आज आपण जाणून घेऊयात त्वचा उजळवण्यासाठी बदाम पावडर कशी वापरायची आणि त्याचे फायदे काय आहेत.

बदाम पावडरचे फायदे –

  • बदामांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या त्वचेला पोषण देते आणि काळे डाग किंवा निस्तेजपणा कमी करते.
  • बदाम पावडर त्वचेसाठी सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते, जे हळहळू मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा चमकण्यास सुरूवात होते.
  • नियमित बदाम पावडर त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग सुधारतो.
  • बदामांमध्ये नैसर्गिक तेल असते, जे त्वचेला मॉइश्चरायझ करते.

कसे वापराल ?

बदाम पावडर आणि मध

साहित्य –

  • बदाम पावडर – 1 चमचा
  • मध – 1 चमचा

कृती –

  • बदाम पावडर आणि मध मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा.
  • तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.
  • सुमारे एक ते दोन मिनिटे हलक्या हाताने मालिश करा.
  • 10 मिनिटे चेहऱ्यावर मिश्रण तसेच ठेवा.
  • 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून द्या.

बदाम पावडर, दही, हळद

साहित्य –

  • बदाम पावडर – 1 चमचा
  • दही – 1 चमचा
  • हळद – चिमूटभर

कृती –

  • सर्वप्रथम बदाम पावडर,दही आणि हळद मिक्स करा.
  • तयार मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा.
  • 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=CWOHHH2UAXD8

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.