अनिल कस्पटे यांची लेक वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज पहाटे पु्ण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली आहे. दोघेही सात दिवसापासून मोकाट फिरत होते.
या सर्व प्रकरणात वैष्णवीच्या बाळाचे खूप हाल झाले आहेत.वैष्णवीच्या बाळाला काल (गुरुवारी) कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. नऊ महिन्याच्या या बाळाची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्याला घेऊन त्याचे नातेवाईक रुग्णालयात गेले आहेत.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाल अनेक लोकांकडे होते. गेले ५ दिवस हे बाळ वेगवेगळ्या व्यक्तींकडे होते.त्यानंतर काल हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आता बाळाची प्रकृती बिघडली आहे. बाळाला रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
(न्यूज अपडेट होत आहे)