हगवणे पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टाबाहेर भाजपच्या महिला आक्रमक, टोमॅटो फेकले
Marathi May 23, 2025 08:25 PM

पुणे : जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi) हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच, अजित पवारांनी काल पोलिसांना आदेश दिल्यानंतर आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता भारतीय जनता पक्ष (भाजपा) शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील (Pune) आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केले आहे. तत्पूर्वीच, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. यावेळी, महिलांनी आक्रम होत ज्या गाडीतून हगवणे पिता-पुत्रास कोर्टात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजप महिला आघाडीने हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात हगवणेंच्या बॅनरला चप्पलने मारहाण करत कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. दरम्यान,भाजप महिला आघाडीच्या आंदोलनाची माहिती मिळताच कोर्टासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणण्यात आले असून त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मेपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फरार फादर-लीकास अडकले

सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्याती वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सासरा आणि दीर फरार होते. त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर फरार सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, शाब्बास..

दरम्यान, आज वैष्णवी हगवणेचे क्रुरकर्मा हरामखोर नीच मारेकरी तिचा सासरा राजेंद्र हगवणे दिर सुशील हगवणेला कोर्टात हजर करतांना पुणे भाजपा महिला मोर्चाच्या रणरागिणींनी त्यांच्यातील संतापाला वाट देतं या हरामखोरांना फाशीचं झाली पाहीजे या घोषणांनी कोर्टाचा परीसर दणाणून सोडला होता. आवाज हमेशा बुलंद रखो, भले शाब्बास माझ्या  वाघीणींनो… असे म्हणत आमदार चित्रा वाघ यांनी भाजप महिला आंदोलनाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.