फेरुला नॅथ्रेक्स किंवा फेरुला फेटीडा या झुडुपापासून मिळणारा चिक वाळवून तयार होणारा पदार्थ म्हणजेच हिंग.
हिंगामध्ये असतो उग्र वासाचं तेल, डिंक आणि रेझिन – हे सर्व पचनासाठी फायदेशीर.
हिंग शरीरातील वायू (गॅस) कमी करतो. पोट फुगणे आणि अपचनावर गुणकारी उपाय!
हिंगामधील तेल जठराला उत्तेजन देतं आणि गॅस ढेकरांच्या स्वरूपात बाहेर टाकतो.
हिंगातील डिंक आणि रेझिन यामुळे वायू सहजपणे बाहेर जातो – आराम मिळतो.
डाळी, कडधान्ये शिजवताना हिंग वापरल्यास ते सहजपणे पचतात.
हिंगाचा वास जरी उग्र असला तरी त्याचा आरोग्यदायी फायदा अमूल्य आहे.
अतिप्रमाणात वापर केल्यास चव बिघडते, पण योग्य प्रमाणात वापरल्यास पचन सुधारते.