Weekend Getaways Within 100 km of Nagpur: सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असून मुलांसाठी हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ असतो. परीक्षा संपल्या, अभ्यासाचा ताण नाही, आणि खूप मोकळा वेळ हातात. पण कितीही सुट्टी हवीहवीशी वाटली, तरी काही दिवसातच ती कंटाळवाणी होऊ लागते. मुलांना सतत घरात बसून टीव्ही, मोबाईल किंवा गेम्समध्ये गुंतून राहणं पालकांच्या चिंतेचा विषय होतो. त्यातच उन्हाचा चटका आणि शहरातील गर्दी टाळून मुलांना कुठे तरी फिरायला नेण्याची पालकांची ओढही वाढते.
पण प्रश्न एकदाच उभा राहतो ''कुठं न्यायचं?'' या प्रश्नाचं उत्तर फारसं लांब नाही. नागपूर शहराच्या अवघ्या ५० किलोमीटरच्या परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही मुलांना एका दिवसात नेऊ शकता ना फार खर्च, ना फार थकवा. या सहली फक्त एकदिवसीय असल्या तरी त्या लहान मुलांसाठी शैक्षणिक, आनंददायी आणि सुरक्षित ठरतात. शिवाय पालकांनाही रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा निवांत मिळतो.जाणून घेऊया अशाच काही खास ठिकाणांची माहिती.
वॉटर पार्क्स आणि अॅम्युझमेंट ठिकाणेउन्हाच्या झळा विसरायला आणि पाण्यात मनसोक्त खेळण्यासाठी आकर्षक ठिकाणे
आदासा वॉटर पार्क नागपूर-स्प्रिंग वैली नेचर पार्क
फन एन फूड वॉटर पार्क, अमरावती रोड
द्वारका वॉटर पार्क नागपूर
लाइट हाऊस वॉटर पार्क, रामटेक
वाघविल वॉटर पार्क आणि रिसॉर्ट, बोर अभयारण्याजवळ
ड्रीमएशिया थीम पार्क आणि रिसॉर्ट, नागपूर
फन प्लॅनेट, पाटणसावंगी
द वेव्ह्स वॉटर अँड अॅम्युझमेंट पार्क, वर्धा
मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्या कुतूहलाला चालना देण्यासाठी काही उत्तम ठिकाणे. जिथे प्राण्यांचे दर्शन, जंगल सफारी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी मुलांसाठी उत्तम पर्याय आहेत.
सिलारी गेट, पेंच व्याघ्र प्रकल्प
गोरेवाडा बायो डायव्हर्सिटी पार्क
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय
बोर व्याघ्र प्रकल्प
सेमिनरी हिल्स
जॅपनिज गार्डन
बालोद्यान सेमिनरी हिल्स नागपूर
ज्ञानवाढीसोबतच करमणुकीचा अनुभव देणारी ठिकाणे
रमण विज्ञान केंद्र
महाराजबाग
अजब बंगला
शहराजवळचे सांस्कृतिक वैभव मुलांना दाखवण्यासाठी असलेली ठिकाणे
दीक्षाभूमी
रामटेक, राम मंदिर, कवी कालिदासाचे स्मारक
ड्रॅगन पॅलेस मंदिर, कामठी
मनसर प्राचीन स्थळ व बोटिंग पॉईंट
उन्हाळी सुटीतील प्रत्येक दिवस खास असतो. तो केवळ मोबाईल, टीव्ही किंवा गेम्समध्ये घालवण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात किंवा ज्ञानाच्या शोधात घालवता आला, तर तो दिवस फक्त आनंददायीच नाही तर संस्मरणीयही ठरतो. तर मग यंदाच्या सुट्ट्यांमध्ये कुठे न्यायचे? याचा विचार करू नका, फक्त बॅग भरा, पाण्याची बाटली घ्या, आणि निसर्ग, इतिहास, मजा आणि शिकण्याच्या या सुंदर सहलीकडे वळा.