वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासऱ्या आणि दिराला 5 दिवसांची पोलीस कोठडी
Webdunia Marathi May 24, 2025 07:45 PM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार झालेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना काल स्वारगेट येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपी सासरे आणि दिराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ALSO READ:

आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजप महिला आघाडीने निर्दर्शन करत आरोपींवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र हगवणे यांच्या बॅनरला चपलेने मारत हेच मारेकरी आहे अशा घोषणा दिल्या.

ALSO READ:

कोर्ट परिसरात भाजप महिला आघाडीच्या नेत्या हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी दुपारी धडक देत हगवणे पिता पुत्राच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी त्यांच्यावर महिलांनी टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला.आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

Edited By - Priya Dixit

ALSO READ:


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.