सोलापूर : कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील आठवर्षीय श्रावणी कोटे हिचा गळा दाबल्याने श्रावणी हिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मंद्रूप पोलिसांनी मुलीच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे. मुलीने आजीसोबत बापाला नको त्या अवस्थेत पाहिल्याने बापाने गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप श्रावणीच्या आईने केला आहे.
ओगसिध्द रेवणसिद्ध कोटे (रा. कुसूर, ता. दक्षिण सोलापूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. ओगसिद्ध याने मुलगी श्रावणी हिला शेतातील वस्तीसमोरच पुरल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) दुपारी उघडकीस आली. पोलिस पाटील महानंदा पाटील यांनी मंद्रूप पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोचून पाहणी केली होती. पोलिसांनी विचारणा केल्यावर मुलीला वस्तीसमोरील खड्ड्यात पुरल्याचे ओगसिद्ध याने सांगितले होते.
त्यानंतर दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ कांबळे व पंचांच्या उपस्थितीत मुलीचा मृतदेह उकरून काढण्यात आला होता. तिच्या अंगात शाळेचा गणवेश होता. तिच्या अंगाला माती चिकटलेली होती. नातेवाईकांनी मुलीची ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शनिवारी (ता. २४) शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ओगसिद्ध याला अटक केली.
त्याला जेलमध्येच सडू द्या, सोडू नकाश्रावणीने बापाला आजीसोबत म्हणजे त्याच्या आईसोबतच नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह वस्तीसमोर पुरल्याचा आरोप मुलीची आई वनिता कोटे हिने केला आहे. तसेच माझ्या मुलीला मारणाऱ्या पतीला जेलमध्येच सडू द्या. त्याला सोडू नका, असेही वनिता हिने म्हटले.