Preity Zinta lashes out at third umpire for denying six to Shashank Singh in PBKS vs DC match : आयपीएलमध्ये शनिवारी दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने पंजाबचा ६ गडी राखून पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे या सामन्यादरम्यान पंजाब किंग्ज संघाची मालकीन प्रिती झिंटा अंपायरच्या एका निर्णयावरून संपातल्याचं बघायला मिळालं. तसेच पंजाबच्या पराभवलाही तिने अंपायरच्या निर्णय़ाला जबाबदार धरलं.
नेमकं काय घडलं?पंजाब किंग्सच्या डावातील १५व्या षटकात मोहित शर्माच्या एका चेंडूवर पंजाबचा फलंदाज शशांक सिंगने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू सीमारेषेकडे गेला. तिथे करुण नायर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला. त्यामुळे त्याने स्वतः हा षटकार असल्याचा इशारा केला. मात्र, तरीही मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे विचारणा केली.
तिसऱ्या अंपायरने बराच वेळ रीप्ले तपासल्यांतर हा षटकार नाकारला आणि पंजाबला ६ धावांऐवजी फक्त १ धाव मिळाली. पंजाब किंग्जवर झालेल्या या अन्यायामुळे प्रिती झिंटाचा राग अनावर झाला. तिने एक्स या सोशल मीडिया साईटवर यांसदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली. तिने तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेत ही मोठी चूक असल्याचं म्हटलं. तसेच आयपीएलमध्ये अशा चुकांना स्थान नसावं, असंही ती म्हणाली.
काय म्हणाली प्रिती झिंटा?''तिसऱ्या पंचाकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही चुकीचा निर्णय देण्यात आला. हा निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य आहे. असे होऊच नये. अशा चुकांना आयपीएलमध्ये स्थान नसावं, असं आमचं मत आहे. मी सामन्यानंतर करुणशी चर्चा केली. त्यानेही तो षटकार असल्याचं सांगितलं. यावरूनच सर्व काही स्पष्ट होते,'' अशी प्रतिक्रिया तिने दिली.
दरम्यान, या सामन्यात दिल्लीने ६ गडी राखून पंजाबचा पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानाता पंजाबने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (५३) आणि मार्कस स्टॉइनिसच्या १६ चेंडूत ४४ धावांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली. त्यांतर २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने १९.३ षटकातच हे लक्ष्य पूर्ण केलं. दिल्लीकडून करुण नायरने ४४ तर समीर रिझवीने नाबाद ५८ धावांची खेळी केली.