rat25p1.jpg
66109
रत्नागिरी : जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसमवेत के. डी. कांबळे, मकरंद पटवर्धन, चैतन्य भिडे आणि विवेक सोहनी.
-------------
जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत
आर्यन, तनया, राघव विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : (कै.) अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५ रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात पार पडली. १७ वर्षाखालील गटात आर्यन धुळप याने, ११ वर्षाखालील गटात राघव पाध्ये याने अपराजित राहून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तनया आंब्रे हिने यश मिळवले.
विविध गटांतील खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सादर करत रोख रक्कम व चषक मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, पत्रकार व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन उपस्थित होते. या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले असून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयोजकांनी यशस्वी स्पर्धेसाठी सर्व खेळाडू व पालकांचे आभार मानले. या स्पर्धातून निवड झालेले खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य निवड स्पर्धेत करणार असून राज्य निवड स्पर्धेसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी शुभेच्छा दिल्या. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन कानविंदे व कुटुंबीय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांची मदत मिळाली.
चौकट
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा :
१७ वर्षाखालील खुला गट : आर्यन धुळप, रुमिन वस्ता, उत्तेजनार्थ- अपूर्व बंडसोडे, मोहित टिकेकर, आयुष रायकर, १७ वर्षाखालील मुली : तनया आंब्रे, आर्या पळसुलेदेसाई, उत्तेजनार्थ- खुशी सावंत, सानवी दामले, रमा कानविंदे, ११ वर्षाखालील खुला गट : राघव पाध्ये, विहंग सावंत, उत्तेजनार्थ बक्षीस: आरव निमकर.