66208
‘रानमाणूस’ गावडेंना
गौरव पुरस्कार घोषित
सावंतवाडी ः कोकणी रानमाणूस तथा पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे यांना यूआरएल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवारी (ता. २९) मुंबईच्या माटुंगा यशवंत नाट्य मंदिरात आयोजित सोहळ्यात वितरण होणार आहे. चांगल्या पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून श्री. गावडे कोकणची संस्कृती आणि विशेषतः पर्यावरणीय मूल्य जपण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. ‘इको-टुरिझम’च्या माध्यमातून कोकणात रोजगाराची संधी निर्माण करून वेगळा आदर्श निर्माण केला.
---------
वेंगुर्लेतील मॅरेथॉन
आता ५ जूनला
वेंगुर्ले ः वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ ला ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड’ आयोजित केली होती. मात्र, ‘ऑरेंज अलर्ट’ असल्यामुळे यात बदल करण्यात आला असून संबंधित दौड ही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनला घेण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन दौडीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेने केले आहे.
-------------
संजय घोगळे उद्या
आकाशवाणीवर
वेंगुर्ले ः येथील रहिवासी, तसेच जिल्ह्याचे अप्पर कोषागार अधिकारी आणि मालवणी व्यंगचित्रकार संजय घोगळे यांची आकाशवाणी सिंधुदुर्ग या चॅनेलवर ‘व्यंगचित्रकला’ विषयावर मंगळवारी (ता. २७) सायंकाळी ५.३० वाजता गीतांजली जाधव यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे. मुलाखत ‘एफएम १०३.६’ वाहिनीवर ऐकता येईल.