सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. हेनरिक क्लासेन याने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झंझावाती शतक झळकावलं आहे.हेनरिकने हैदराबादच्या हंगामातील शेवटच्या अर्थात 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ही कामगिरी केली. हेनरिकचं हे आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं आहे. हेनरिकने या वादळी शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी करण्यासह अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.
सनरायजर्स हैदराबादचा विकेटकीपर बॅट्समन हेनरिक क्लासेन याने अवघ्या 37 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. हेनरिकने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 9 षटकार लगावले. हेनरिक यासह सनरायजर्स हैदराबादसाठी आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. हेनरिकने याबाबतीत ट्रेव्हिस हेड याचा रेकॉर्ड ब्रेक केला. हेडने 39 बॉलमध्ये शतक केलं होतं.