इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने शेवटचा सामना गाजवला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स रविवारी (२५ मे) आयपीएल २०२५ मधील शेवटचा सामना एकमेंकाविरुद्ध दिल्लीत खेळत आहेत.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलतातासमोर विक्रमी २७९ धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने वादळी शतक केले, तर ट्रॅव्हिस हेडने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे या सामन्यात अनेक मोठे विक्रम झाले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २७८ धावा केल्या. ही आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे, तर यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. हैदराबादनेच यंदाच्या हंगामात पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा केल्या होत्या.
ही दुसरी सर्वोच्च, तर यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्या ४ सर्वोच्च धावसंख्या हैदराबादने केल्या आहेत. त्याशिवाय हैदराबादने सर्वाधिक ५ वेळा टी२०मध्ये २५० धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रमही केला आहे.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या२८७/३ - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०२४
२८६/६ - सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, हैदराबाद, २०२५
२७८/३ - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली, २०२५
२७७/३ - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद, २०२४
२७२/७ - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, विशाखापट्टणम, २०२४
२६६/७ - सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०२४
५ वेळा - सनरायझर्स हैदराबाद
३ वेळा - भारत
३ वेळा - सरे
क्लासेनने ३७ चेंडूत या सामन्यात शतक ठोकले. त्यामुळे तो हैदराबादचा आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला, तसेच आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने युसूफ पठाणची बरोबरी केली आहे.
क्लासेनने या सामन्यात ३९ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. त्याच्यासह ट्रॅव्हिस हेडने ४० चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने १६ चेंडूत ३२ धावा केल्या, तर इशान किशनने २९ धावा केल्या.
आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक३० चेंडू - ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पुणे वॉरियर्स इंडिया, बंगळुरू, २०१३)
३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स, जयपूर, २०२५)
३७ चेंडू - हेनरिक क्लासेन (सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली, २०२५)
३७ चेंडू - युसूफ पठाण (राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, मुंबई, २०१०)
३८ चेंडूत - डेव्हिड मिलर (पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली, २०१३)