राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. कोकणताल आणि पुण्यातील काही तालुक्यांमध्ये पावासने थैमान घातले आहे. पुण्याच्या बारामती तालुक्यात तर मान्सून पूर्व पावसाने 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. ओढे, नाले आणि तलावांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालंय. बारामती आणि दौंड तालुक्यांना पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील 3 इमारतींना तडे गेले आहेत. या घटनेनंतर इमारती नागरिकांनी तातडीने जवळील पोलीस ठाण्यात धाव घेतलीय.
बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौका शेजारील ३ बिल्डिंग पावसाने खचल्या आहेत. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे आहेत. तिन्ही बिल्डिंगमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला धाव घेतलीय. सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आली आहेत. फ्लॅटमधील सर्व नागरिक रस्त्यावर आलेत. प्रशासनाकडून या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु असल्याची शक्यता आहे.