सुमारे १५० वर्षांपूर्वी म्हणजे १८७० च्या दशकातले जेजुरीचे खंडोबा मंदिर आजच्या तुलनेत खूपच वेगळं दिसत होतं. तेव्हाचं बांधकाम मुख्यतः दगडी होतं आणि अलंकरण फारसं नव्हतं.
जुने मंदिर स्थापत्य
मंदिराचं मूळ वास्तुशिल्प साधं आणि मजबूत होतं. शिखर आणि प्रवेशद्वार कोरीव कामाने सजलेले होते.
प्रवेशमार्ग आणि पायऱ्या
त्या काळी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या होत्या. काही भाग दगडांचे तर काही मातीचे होते. यात्रेकरूंना चढाई करताना खूप मेहनत घ्यावी लागायची.
या सर्व छायाचित्रातून तुम्ही जेजूरी गडाचे मनमोहक आणि आध्यात्मिक दृश्य पाहू शकता
त्या काळी आजसारखीच गर्दी असायची आणि भक्तांचा खंडोबावर प्रचंड विश्वास होता. मुख्यतः ग्रामस्थ आणि धनगर समाजाचे लोक खंडोबाच्या यात्रेला यायचे.
सद्या उपलब्ध असलेले जुने फोटो हे मुख्यतः ब्रिटिश किंवा स्थानिक फोटोग्राफर्सकडून घेतले गेले होते.
त्यावेळी मंदिराभोवती फारसा विकास नव्हता. डोंगरकाठचा परिसर नैसर्गिक होता. आता दिसणारी दुकानं, रस्ते किंवा वाहतूक व्यवस्था तेव्हा जास्त नव्हती.
या ऐतिहासिक छायाचित्रांनी खंडोबा मंदिराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला आहे. “जय मल्हार” ही भावना तेव्हाही होती आणि आजही तितकीच जिवंत आहे.
खंडोबाची मूर्ती तेव्हाही पूजली जायची. पूजा पारंपरिक पद्धतीने केली जायची तेल, भंडारा ही त्याची मुख्य वैशिष्ट्यं होती.