अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्सने २५ मे रोजी आयपीएल २०२५ स्पर्धेत ८३ धावांनी पराभूत केले.
गुजरात टायटन्स प्लेऑफपूर्वीचा हा अखेरचा साखळी सामना होता.
गुजरातने प्लेऑफमध्ये आधीच प्रवेश केला असल्याने त्यांचे अद्याप आव्हान संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे गुजरात प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र प्लेऑफच्या आधी गुजरातला धक्काही बसला आहे.
गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर प्लेऑफच्या आधी मायदेशी परतणार आहे.
त्याला इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायचे असल्याने तो गुजरातसाठी प्लेऑफसाठी उपलब्ध नसणार आहे.
आयपीएल एका आठवड्याने पुढे ढकलल्याने गुजरातला हा धक्का बसला.
गुजरातने त्याच्या जागेवर प्लेऑफसाठी श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिसला बदली खेळाडू म्हणून घेतले आहे.
बटलकरने आयपीएल २०२५ मध्ये १४ सामन्यांत ५ अर्धशतकांसह ५३८ धावा केल्या.