तरूणांमधील हार्ट अटॅकच्या वाढत्या घटना पाहता हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून यायचे. पण, आता अगदी शाळकरी विद्यार्थांपासून ते तरूण वयातील मुलांना हार्ट अटॅक येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हार्ट अटॅकमुळे अनेक सेलिब्रिटींनी आपला जीव गमवला आहे. यात 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सेलिब्रिटींचा समावेश होता. एकूणच सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकही हार्ट अटॅकला बळी पडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आज आपण कमी वयात म्हणजेच अगदी तरूण वयातच हार्ट अटॅक येण्याची काही सामान्य कारणे पाहणार आहोत.
हार्ट अटॅक येण्याचे सर्वात मोठे कारण डायबिटीज ठरत आहे. यात रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीवर गेल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे.
तणावात राहणे हे देखील हृदयासाठी हानिकारक आहे. तणावामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
तरूण वयात धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या सवयींमुळे रक्तवाहिन्या खराब होतात आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येतो.
तरूण वयात धावपळीच्या लाईफस्टाइलमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि पूरेशी झोप याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे एकूण आरोग्यावर परिणाम होऊन हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण येतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरूवात होते.
काहीवेळा अनुवंशिकतेमुळे हार्ट अटॅकचे येण्याचा धोका अधिक असतो.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले की, रक्ताच्या नसांमध्ये ते जमा होते आणि हृदयाकडे जाणारे रक्त थांबते, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
लठ्ठपणा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हेही पाहा –