महाद्वार रोडवर
एकास मारहाण
कोल्हापूर ः महाद्वार रोडवर झालेल्या मारहाणीत संजय गंगाराम चौगुले (वय ५०, फुलेवाडी) जखमी झाले. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
दुचाकी घसरून
दोघे जखमी
कोल्हापूर ः व्हनाळी (ता. कागल) येथे दुचाकी घसरून पडल्याने जतीन सरदार (वय २८) व चांद मंडल (२५, व्हनाळी) जखमी झाले. सोमवारी रात्री हा अपघात घडला. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
गरम पाणी अंगावर
पडून चिमुकली जखमी
कोल्हापूर ः गरम पाणी अंगावर पडल्याने अन्वी अभिनंदन कांबळे (वय ५ टेंबलाईवाडी) ही चिमुकली जखमी झाली. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.
....................
छतावरून पडून
एकजण जखमी
कोल्हापूर ः वाघवे (ता. पन्हाळा) येथे छतावरून पडल्याने विकास सुदाम कांबळे (वय ४४) जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...................