
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी होती. त्यात आता दुपारनंतर उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरु आहे. पश्चिम उपनगरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह नवी मुंबई परीसरातही पावसाला सुरुवात झाली आहे. कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे.
सविस्तर बातमी लवकरच…