‘भोगावती’ने एफआरपीतील
उर्वरित १३५ जमा करावेत
राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील एफआरपीतील उर्वरित १३५ रुपये आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा साखर सहसंचालकांकडे दाद मागू, असे निवेदन भोगावती परिसर शेतकरी संघटनेच्या वतीने भोगावती कारखाना प्रशासनाला दिले आहे. भोगावतीची एफआरपी ३३३५ रुपये आहे. त्यापैकी ३२०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. उर्वरित १३५ रुपये आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. २०२० पासून सभासद साखर मिळालेली नाही ती द्यावी, २०१७-१८ च्या हंगामातील ऊस बिलापैकी आठ कोटी रुपये देणे बाकी द्यावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर जनार्दन पाटील, साताप्पा पाटील, विलास पाटील, अण्णाप्पा चौगले, रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, शंकर पाटील, शंकर झांजगे, शामराव टेपुगडे यांच्या सह्या आहेत.