मविआतून विधानसभा लढलेल्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; काकांची साथ सोडून धरला दादांचा हात
Marathi May 28, 2025 06:26 PM

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षात इनकमिंग सुरू असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही पक्षप्रवेश होत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही विविध जिल्हा व तालुक्यातील अनेक स्थानिक नेते अजित पवारांचे (Ajit pawar) नेतृत्व स्वीकारत आहेत. त्यातच, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढलेल्या दोन नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीगोंदा विधानसभा अपक्ष लढलेले राहुल जगताप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्रीगोंदा विधानसभा लढलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादीचा गमछा गळ्यात घातला. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याहस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

माजी आमदार आणि कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच, राजेंद्र नागवडे यांचा देखील प्रवेश होतं आहे. सहकार चळवळीतील मातब्बर नेते पक्षात प्रवेश करत असून त्यांच्या आई-वडिलांनी देखील सहकाराचं जाळं नगर जिल्ह्यात उभा केलं आहे. मी जलसंपदा विभागाचे मंत्री होतो, त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. आज एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले दोन्ही उमेदवार आमच्यासोबत येत आहेत. तर, जून महिन्यात मोठा पक्ष प्रवेश सोहळा करणार आहोत, असे सुनील तटकरे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना सांगितले. अजित दादांच्या नेतृत्वात काम करत असताना पक्षाची पूर्णपणे ताकद आपल्या पाठीशी उभी केली जाईल, असे आश्वासनही पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांना दिले.

आमदारांची बैठक पुढे ढकलली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आणि माजी आमदारांची आज बैठक होणार होती. मात्र, पावसामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. पुढील आठवड्यात ही बैठक होईल. महिला पदाधिकाऱ्यांची 31 ऑगस्ट रोजी बैठक होणार होती, ती रद्द केली आहे. 10 जूनला आम्ही पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडी येथे साजरा करणार आहोत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. तसेच, या वर्धापन दिनावेळी मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं.

मुंबईत मुळात पाऊस लवकर

दरम्यान, मुंबईत मेट्रोचं काम सुरू असताना अचानक पाऊस आला. मुळात हा पाऊस लवकर आला, तोपर्यंत कामं झाली नव्हती. त्यामुळे नुकसान झालं आहे. याआधी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचेही त्यांनी मुंबईती मेट्रो स्टेशनवरील पाणीसाठ्याबद्दल बोलताना म्हटले.

हेही वाचा

शेतकऱ्याकडून 30 हजारांची लाच घेताना महसूलचे 3 कर्मचारी जाळ्यात; एसीबीची बेधडक कारवाई

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.