New Rules 1 June : ६ मोठे नियम १ जूनपासून बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
ET Marathi May 28, 2025 06:45 PM
मुंबई : तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी १ जून २०२५ पासून बदलणार (New rules change from June 1) आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करतील. गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते बँकिंग आणि कर प्रणालीपर्यंत अनेक नवीन गोष्टी लागू केल्या जातील. १ जूनपासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया. १. एटीएममधून पैसे काढणे महागणारएटीएममधून पैसे काढण्याचे शुल्कही १ जूनपासून वाढू शकते. आता मर्यादित मोफत व्यवहारांनंतर, प्रत्येक व्यवहारात जास्त पैसे कापले जाऊ शकतात. त्यामुळे एटीएम वापरताना काळजी घेणे आवश्यक असेल. २. क्रेडिट कार्डवर अतिरिक्त शुल्क क्रेडिट कार्ड धारकांना काही कठोर नियम लागू होऊ शकतात. तुमचे ऑटो डेबिट अयशस्वी झाले तर तुम्हाला २% पर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, युटिलिटी बिल किंवा इंधनासाठी कार्ड वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉइंट्सची कपात देखील शक्य आहे. ३. स्वयंपाकाचा गॅस महाग एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. त्यामुळे १ जून रोजी गॅस सिलेंडर महाग किंवा स्वस्त होऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या बजेटवर होईल. ४. ईपीएफओ सेवा सोप्या सरकार १ जूनपासून ईपीएफओची नवीन आवृत्ती ३.० लाँच करू शकते. याद्वारे पैसे काढणे, दावा करणे किंवा तपशील अपडेट करणे यासारख्या पीएफशी संबंधित सेवा पूर्वीपेक्षा सोप्या होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एटीएमसारख्या कार्डचा वापर करून पीएफ खात्यातून थेट पैसे काढता येतील. ५. जीएसटी इनव्हॉइस नियमांमध्ये बदलजीएसटीएनने एका महत्त्वाच्या बदलाची माहिती दिली आहे. १ जूनपासून इनव्हॉइस क्रमांक केस-सेन्सिटिव्ह राहणार नाहीत (अपरकेस किंवा लोअरकेस हा फरक मानला जाणार नाही). म्हणजे abc, ABC किंवा Abc हे तिन्ही समान मानले जातील. यामुळे डुप्लिकेट इनव्हॉइस नंबर तयार करण्याची समस्या दूर होईल. तसेच इनव्हॉइस क्रमांक आपोआप अपरकेस अक्षरांमध्ये रूपांतरित होतील. ६. एफडी व्याजदर पुढील महिन्यात ६ जून रोजी आरबीआयची बैठक होणार आहे. बैठकीत आरबीआय रेपो दर कमी करू शकते अशी अपेक्षा आहे. असे झाले तर बँका एफडीवरील व्याजदर कमी करू शकतात. अलिकडेच एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस सारख्या बँकांनी एफडीवरील व्याज कमी केले होते. आता आरबीआयने रेपो रेट कमी केला तर बँका पुन्हा एफडीवरील व्याज कमी करू शकतात.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.